IMPIMP

Shrikant Eknath Shinde | राष्ट्रवादीने पोस्ट केलेल्या ‘त्या’ फोटोवर श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘मी दोन टर्म खासदार आहे, मला…’

by nagesh
Shrikant Eknath Shinde | shrikant eknath shinde on viral photo said i m two term mp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Eknath Shinde) सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी केला आहे. वरपे यांनी श्रीकांत शिंदे (Shrikant Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो ट्विट केला आहे. यावरुन राजकारण तापले असताना श्रीकांत शिंदे यांनी यावर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फोटोतील घर हे आमचं आहे

खुर्ची मागे तो बोर्ड होता, याची आपल्याला कल्पनाही नव्हती, असं श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Eknath Shinde) म्हटलं आहे. आज एक व्हीसी आहे. त्यासाठी ती व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठीच माझ्या अधिकाऱ्यानं मागच्या बाजूला बोर्ड आणून ठेवला असेल. पण तो बोर्ड तिथे असेल, याची मला कल्पनाही नव्हती. हे आमचं घर आहे. या घरातून समस्या सोडविण्याचे काम वर्षानुवर्षे होत आहे. ही व्यवस्था तात्पुरती करण्यात आली होती, असे शिंदे यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मी दोन टर्मचा खासदार आहे

झालेला प्रकार अनावधानाने झाला असेल, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या गोष्टी अनावधानाने झाल्या असतील. पण या गोष्टी फुगवून ते शासकीय निवासस्थान, मुख्यमंत्र्यांची खुर्ची असल्याचं सांगितलं. मी दोन टर्म खासदार (MP) आहे. मला माहिती आहे की कुठे बसायचं आणि कुठे नाही बसायचं, असं सांगताना बाहेर मुख्यमंत्र्यांचा बोर्ड लावला आहे. तिथे जर मी बाजूला जाऊन उभा राहिलो, तर त्यातूनही कदाचित वेगळा अर्थ काढला जाईल. यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

राजकारणात प्रत्येकजण इतरांच्या छोट्या-मोठ्या चुका बघत असतो. आपण आपलं काम करायचं असतं.
आपल्याला देलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा असतो.
कोण काय म्हणतं, याकडे लक्ष देत बसलो, तर आपण आपलं काम करु शकणार नाही, असंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Web Title :-  Shrikant Eknath Shinde | shrikant eknath shinde on viral photo said i m two term mp

हे देखील वाचा :

Ajit Pawar | जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हा गृहमंत्री करा म्हंटलं, पण वरिष्ठांनी…, अजित पवारांनी बोलून दाखवली मनातली खदखद

Keshav Upadhye | आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा!, आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान

Pune Crime | चित्रपट निर्मितीसाठी पुण्यात सुरु केली वित्तिय संस्था, कर्ज मंजुरीच्या आमिषाने 100 ते 150 जणांना फसवणारी बंटी-बबलीची जोडी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

Related Posts