IMPIMP

नवी दिल्ली : Silver vs Gold vs Sensex | २०२४ सुरू होताच सोने आणि शेयर बाजाराची चर्चा सर्वात जास्त होत आहे. स्‍टॉक मार्केट विक्रम करत आहे, सोन्याचे दरही आकाशात गेले आहेत. परंतु, हे सर्व विक्रम आणि चर्चेदरमयान एक प्रॉडक्ट असेही आहे ज्याने या सर्वापेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. जानेवारी ते आतापर्यंत बोलायचे तर चांदीचा रिटर्न अन्य सर्व गुंतवणूक पर्यायांपेक्षा कितीतरी जास्त राहिला आहे. आकडे पाहिले तर समजू शकते की सोने असो की सेन्सेक्स, चांदीच्या चमकेपुढे सर्व फिके पडले आहेत. सेन्सेक्स शुक्रवारी २१ जूनला जरी ४०० अंकापेक्षा जास्त घसरणीवर राहिला असला तरी सुद्धा तो ७७ हजारच्या आकड्याच्या वर ट्रेडिंग करत आहे. अशाप्रकारे, निफ्टीसुद्धा शुक्रवारी वाढल्यानंतर १०० अंकांनी घसरला, तरीसुद्धा २३,५०० अंकाच्या जवळपास ट्रेडिंग करताना दिसला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीचा हा विक्रमी स्तर आहे. यामुळे सहाजिकच बहुतांश गुंतवणुकदारांनी पैसे लावण्यासाठी शेयर बाजार निवडला आहे. शेयर बाजाराने किती दिला रिटर्न १ जानेवारीपासून २० जून, २०२४ पर्यंत सेन्सेक्सने ७.२५ टक्के रिटर्न दिला. तर निफ्टीचा रिटर्न ८.४५ टक्के होता. तर बँक निफ्टीने सुद्धा या काळात ७.२३ टक्के रिटर्न दिला आहे. सोन्यावर किती मिळाला रिटर्न १ जानेवारी २०२४ ला दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा हाजीर भाव ६३,९७० रुपये होता. तर, २० जूनला तो ७२,५५० रुपयांच्या स्तरावर बंद झाला. अशाप्रकारे सोन्याने गुंतवणुकदारांना या काळात १४.८७ टक्के रिटर्न दिला. चांदीची चमक सर्वात जास्त या वर्षात जानेवारी ते आतापर्यंत सर्वात जास्त रिटर्न देणारे प्रॉडक्ट चांदी आहे. १ जानेवारी २०२४ ला चांदीचा हाजीर भाव ७८,६०० रुपये प्रति किलो होता. तर, २० जूनला चांदीचा भाव ९२,३०० रुपयांवर बंद झाला. अशा प्रकारे चांदीने या काळात २२.९७ टक्के बंपर रिटर्न दिला.

June 21, 2024

नवी दिल्ली : Silver vs Gold vs Sensex | २०२४ सुरू होताच सोने आणि शेयर बाजाराची चर्चा सर्वात जास्त होत आहे. स्‍टॉक मार्केट विक्रम करत आहे, सोन्याचे दरही आकाशात गेले आहेत. परंतु, हे सर्व विक्रम आणि चर्चेदरमयान एक प्रॉडक्ट असेही आहे ज्याने या सर्वापेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. जानेवारी ते आतापर्यंत बोलायचे तर चांदीचा रिटर्न अन्य सर्व गुंतवणूक पर्यायांपेक्षा कितीतरी जास्त राहिला आहे. आकडे पाहिले तर समजू शकते की सोने असो की सेन्सेक्स, चांदीच्या चमकेपुढे सर्व फिके पडले आहेत.

सेन्सेक्स शुक्रवारी २१ जूनला जरी ४०० अंकापेक्षा जास्त घसरणीवर राहिला असला तरी सुद्धा तो ७७ हजारच्या आकड्याच्या वर ट्रेडिंग करत आहे. अशाप्रकारे, निफ्टीसुद्धा शुक्रवारी वाढल्यानंतर १०० अंकांनी घसरला, तरीसुद्धा २३,५०० अंकाच्या जवळपास ट्रेडिंग करताना दिसला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीचा हा विक्रमी स्तर आहे. यामुळे सहाजिकच बहुतांश गुंतवणुकदारांनी पैसे लावण्यासाठी शेयर बाजार निवडला आहे.

शेयर बाजाराने किती दिला रिटर्न

१ जानेवारीपासून २० जून, २०२४ पर्यंत सेन्सेक्सने ७.२५ टक्के रिटर्न दिला. तर निफ्टीचा रिटर्न ८.४५ टक्के होता. तर बँक निफ्टीने सुद्धा या काळात ७.२३ टक्के रिटर्न दिला आहे.

सोन्यावर किती मिळाला रिटर्न

१ जानेवारी २०२४ ला दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा हाजीर भाव ६३,९७० रुपये होता. तर, २० जूनला तो ७२,५५० रुपयांच्या स्तरावर बंद झाला. अशाप्रकारे सोन्याने गुंतवणुकदारांना या काळात १४.८७ टक्के रिटर्न दिला.

चांदीची चमक सर्वात जास्त

या वर्षात जानेवारी ते आतापर्यंत सर्वात जास्त रिटर्न देणारे प्रॉडक्ट चांदी आहे. १ जानेवारी २०२४ ला चांदीचा हाजीर भाव ७८,६०० रुपये प्रति किलो होता. तर, २० जूनला चांदीचा भाव ९२,३०० रुपयांवर बंद झाला. अशा प्रकारे चांदीने या काळात २२.९७ टक्के बंपर रिटर्न दिला.