IMPIMP

Skin Care Tips | दह्यासोबत हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर, मिळतील ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

by nagesh
Skin Care Tips | benefits of turmeric and curd skin care tips

सरकारसत्ता ऑनलाइन – Skin Care Tips | हळद (Turmeric) आणि दही (Curd) लावल्याने तुमच्या त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. तर, दह्यामध्ये झिंक, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी (Vitamin B) आणि लॅक्टिक अ‍ॅसिड आढळते. या दोन्ही गोष्टी त्वचेशी संबंधित समस्या दूर करतात आणि यामुळे चेहर्‍यावर चमक येते. (Skin Care Tips)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1. त्वचेवर येईल ग्लो
हळद आणि दह्याच्या वापराने त्वचेवर चमक येईल. यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियमसारखे घटक आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. दही, हळद, बेसन आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा आणि 10 मिनिटे ठेवा. काही वेळाने चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे चेहर्‍यावर चमक येईल.

2. एजिंग प्रॉब्लेम होईल दूर
दही आणि हळदीच्या वापरामुळे त्वचेवरील एजिंगची लक्षणेही कमी होतात. हळद आणि दह्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात. दुसरीकडे, हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन सुरकुत्या दूर करते. दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि झिंकचे प्रमाण देखील त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. (Skin Care Tips)

एका भांड्यात एक चमचा हळद, एक चमचा दही, 1 चमचे कोरफड जेल आणि गुलाबपाणीचे काही थेंब एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. हा फेसपॅक 15 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेला चमक येईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

3. ऑयली स्कीनच्या समस्येसाठी
ऑयली स्कीनच्या समस्येसाठी अंड्याचा पांढरा भाग दही आणि हळदमध्ये मिसळा आणि लावा. यामुळे मुरुम आणि तेलकट त्वचेची समस्या दूर होईल. हा फेसपॅक तयार केल्यानंतर 10 मिनिटे चेहर्‍यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. अंड्यामध्ये प्रोटीन आढळते, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

4. डागांसाठी
डाग हलके करण्यासाठी हळद, दही आणि गुलाबपाणीच्या मिश्रणात चंदन पावडर मिसळा. आता हा फेसपॅक चेहरा आणि मानेच्या भागावर लावा. फेसपॅक सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. हळदीमध्ये बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करणारे अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तसेच दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड देखील असते. ते त्वचेला एक्सफोलिएट करते आणि डाग कमी करण्यास मदत करते.

5. टॅन कमी करा
टॅनच्या समस्येवरही हळद आणि दही लावल्याने फायदा होईल. हळदीमध्ये कर्क्युमिनॉइड नावाचे पॉलिफेनॉल असते, जे त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करते.
दुसरीकडे, दही त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एका भांड्यात एक चमचा हळद, एक चमचा दही आणि गुलाबजलाचे काही थेंब एकत्र करा.
ते टॅन झालेल्या भागावर लावा आणि 15 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.
यामुळे त्वचेला मॉयश्चरायझेशन राहील. हळद आणि दह्याचा फेस पॅक लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या.
हळद किंवा दहीची अ‍ॅलर्जी असेल तर ते लावू नका.

Web Title :- Skin Care Tips | benefits of turmeric and curd skin care tips

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | मुंबै बँक निवडणूकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘त्यांना पुर्णपणे संपवण्याचा…’

Calcium Deficiency | शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची इशारा देतात ‘ही’ 7 लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात सुसाईड नोट लिहून माय-लेकीची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Related Posts