IMPIMP

Skymet Monsoon Update | भारतात मान्सूनचं आगमन कधी ?; स्कायमेटनं सांगितली ‘ही’ तारीख, जाणून घ्या

by nagesh
Skymet Monsoon Update | skymet monsoon news when will the monsoon arrive in india the date announced by skymet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Skymet Monsoon Update | सध्या राज्यासह देशात उन्हाचा कडाका लागला आहे. काही भागात तर पावसाचीही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, यंदा देशात मान्सून (Skymet Monsoon Update) सरासरीच्या 98 टक्के राहणार असल्याचा अंदाज स्कायमेट संस्थेने (Skymet Institute) वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर (June to September) या चार महिन्यांच्या कालावधीसाठीचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे. देशात सलग चौथ्या वर्षी सामान्य अथवा त्यापेक्षा अधिक मान्सून राहणार असल्याचे सांगितले. तसेच, यंदा मान्सून सामान्य राहणार असून 26 मे रोजी मान्सून केरळात (Kerala) दाखल होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

स्कायमेटच्या माहितीनुसार, 1961 ते 2019 पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित, भारतात मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 1 जून आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सूनची सुरुवात मुख्यत्वे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील समुद्राच्या परिस्थितीवर अवलंबून असते. तर, आलेल्या आसनी चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील मान्सूनचा प्रवाह सामान्यपेक्षा लवकर बंद झालाय. आसनीच्या परिणामामुळे अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागावरील प्रति चक्रीवादळ नष्ट झालेय. दरम्यान, केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस व्यापक असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Skymet Monsoon Update)

दरम्यान, स्कायमेटच्या अंदाजानुसार देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 98 टक्के राहण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्क्यांपेक्षा कमी अथवा अधिक एरर मार्जिन आहे. स्कायमेटने याआधी 21 फेब्रुवारी रोजी मान्सूनचा अंदाज जारी केला होता, ज्यात यंदा मान्सून सामान्य असेल असं सांगितलं होते.

स्कायमेट काय आहे ?
स्कायमेट ही हवामान अंदाज (Weather Forecast) आणि कृषी जोखीम उपाय या क्षेत्रातील एक भारतातील खासगी कंपनी आहे.
देशातील एकमेव खासगी क्षेत्रातील हवामान अंदाज वर्तवणारी स्कायमेट ही संस्था आहे.
ती 2003 साली सुरु झाली. तेव्हापासून स्कायमेट सतत हवामानाचा अंदाज वर्तवते.
स्कायमेट स्वत:चे अंकीय हवामान अंदाज मॉडेल (Numerical Weather Forecast Model) चालवते.

Web Title :- Skymet Monsoon Update | skymet monsoon news when will the monsoon arrive in india the date announced by skymet

हे देखील वाचा :

Chhatrapati Sambhaji Raje | ‘छत्रपतींच्या भूमीत औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणे चुकीचे’

Multibagger Stock | 17 रुपयांचा शेअर आज आहे 1900 च्या पुढे, गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक ?

Pune Riverfront Development Project | पुण्यातील ’या’ मोठ्या प्रकल्पात शरद पवारांनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घातले लक्ष

Related Posts