IMPIMP

Small Savings Schemes | मोदी सरकारचा निर्णय ! अल्प बचत योजनांवरील व्याजदर कायम राहणार; जाणून घ्या

by nagesh
Small Saving Schemes | small saving schemes sukanya samriddhi yojana public provident fund national saving certificate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Small Savings Schemes | अधिकत्तर लोक आपली अर्थिक बचत करण्यासाठी अनेक योजना पाहत असतात. त्याचबरोबर लहान बचत करणा-यांसाठी देखील त्यांच्या मर्यादीत अर्थिक बचतीप्रमाणे ते योजना शोधत असतात. दरम्यान, लहान बचत योजना धारकांसाठी (Small Savings Schemes) एक महत्वाची माहिती समोर आहे. 2022 मधील नववर्षाच्या पहिल्या तिमाहीवरील लहान योजनांवरील व्याज दर कायम ठेवले गेले आहेत. यामध्ये काही योजना आहेत. त्या योजनामधील व्याजदर 2021-2022 च्या अखेरच्या तिमाहीत होते, तेच आता कायम असणार आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोरोनाच्या महामारीत अनेक लोकांना हालअपेष्ठा भोगावी लागली आहे. अनेक लोकांचं उत्पन्न घटलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून (Modi Government) याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सरकारकडून अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. यात सलग 5 तिमाहींवरील व्याज दरात बदल केलेले नाही. यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर जाणून घ्या काय आहेत योजना. (Small Savings Schemes)

भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) –

भविष्य निर्वाह निधी म्हणजेच (PPF) वर देण्यात येणारे 7.1 टक्के वार्षिक व्याजदर कायम राहणार आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate) –

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) या योजनेवर भविष्य निर्वाह निधीनंतर (PPF) सर्वात जास्त व्याज मिळते. हे व्याज 6.8 टक्के कायम राहील.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samrudhi Yojana) –

कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी वयाच्या 18 वर्षापर्यंत सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samrudhi Yojana) आहे. या योजनेवर पीपीएफपेक्षा जास्त व्याज दिले जाते. सध्या या योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळते, ते कायम आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जेष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) –

कमी उत्पन्न असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे. या योजनेवर 7.4 टक्के दिले जाणारे व्याज कायम आहे.

पोस्ट ऑफिस बचत योजना (Post Office Savings Plan) –

पोस्ट ऑफिस बचत योजनाच्या माध्यमातून 5 वर्षाच्या फिक्स डिपॉजीटवर 6.7 टक्के व्याज दिले जाते. ही व्याजाची रक्कम कायम ठेवण्यात आलीय.

Web Title : Small Savings Schemes | central government interest rates on small savings schemes unchanged for fourth quarter of fy 22

हे देखील वाचा :

Boiled Egg Benefits | जर यावेळी खाल्ले रोज 1 उकडलेले अंडे तर दूर पळून जातील अनेक आजार, होतील जबरदस्त फायदे

BSNL Prepaid Plans | बीएसएनएलचा जबरदस्त प्लान ! फक्त 187 रुपयात 2 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग, अन्..

Pune Crime | पुण्यातील तरुणीचा पोलीस चौकीत राडा ! अश्लिल शिवीगाळ करत पोलिसांचा गणवेश फाडला

Related Posts