IMPIMP

Smelly Underarms | घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात का? या उपायांद्वारे होईल सुटका

by nagesh
Smelly Underarms | smelly underarms in summer home remedies lemon baking soda tomato apple cider vinegar potato rock salt

सरकारसत्ता ऑनलाइन –  Smelly Underarms | उन्हाळ्यात शरीरातून खूप घाम येतो, त्यामुळे अनेकदा अंडरआर्म्समधून दुर्गंधी येऊ लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण डिओड्रंटकिंवा कोणताही परफ्यूम वापरतो, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर कायमस्वरूपी उपाय केला पाहिजे. अंडरआर्म्सच्या दुर्गंधीपासून मुक्ती काय करावे ते जाणून घेवूया… (Smelly Underarms)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी 5 घरगुती उपाय
उन्हाळ्यात शरीराचे तापमान राखणे खूप गरजेचे असते, त्यामुळे शरीराच्या छिद्रातून घाम बाहेर पडतो. जेव्हा हा घाम अंडरआर्म्समध्ये असलेल्या बॅक्टेरियामध्ये मिसळतो तेव्हा दुर्गंधी येते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपायांचा अवलंब केला पाहिजे.

1. टोमॅटोचा रस (Tomato juice)
अंडरआर्म्सच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी टोमॅटोचा रस वापरता येऊ शकतो. यासाठी टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा आणि त्यात लिंबाचा रस घाला. अंडरआर्म्सवर मसाज करा आणि काही वेळाने धुवा. (Smelly Underarms)

2. बटाटा (Potato)
बटाट्याच्या वापराने घामाची दुर्गंधी दूर होते. तुम्ही एक बटाटा घ्या आणि त्याची साल काढा आणि त्याचे तुकडे करा. आता हे तुकडे एक एक करून अंडरआर्म्समध्ये घासून अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा.

3. लिंबू आणि सोडा (Lemon and Soda)
लिंबू आणि बेकिंग सोडा घामाची दुर्गंधी आणि अंडरआर्म्सचा काळेपणाही दूर करतो. 1 चमचे लिंबाचा रस आणि 2 चमचे बेकिंग सोडा मिक्स करा आणि काखेत गोलाकार मसाज करा. हे लक्षात ठेवा की शेव्ह केल्यानंतर लगेच या पद्धतीचा अवलंब करू नका, अन्यथा त्वचेवर जळजळ होऊ शकते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

4. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
अंडरआर्म्सच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरू शकता. सर्व प्रथम, स्वच्छ स्प्रे बाटलीमध्ये 1 कप अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि अर्धा कप पाणी मिसळा आणि बाटलीमध्ये ठेवा. आता मिश्रण रात्री आंघोळीनंतर कोरड्या अंडरआर्म्सवर स्प्रे करा. दुसर्‍सा दिवशी सकाळी बगल स्वच्छ करा.

5. रॉक सॉल्ट (Rock salt)
सैंधव मीठ काखेतील दुर्गंधी दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो.
आंघोळ करताना बादलीत खडे मीठ मिसळा आणि या पाण्याने संपूर्ण शरीर धुवा.
जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर अशा प्रकारे या समस्येवर मात करता येते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Smelly Underarms | smelly underarms in summer home remedies lemon baking soda tomato apple cider vinegar potato rock salt

हे देखील वाचा :

Pune Crime | गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन पुण्यात तरुणाचा खून, 5 जणांना अटक

Raw Milk | कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी लाभदायक की नुकसानकारक? जाणून घ्या काय आहे सत्य

Har Ghar Tiranga | जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

Related Posts