IMPIMP

Sodium Deficiency Symptoms | ‘या’ लक्षणांमुळे शरीरात सोडियमची कमतरता निर्माण होऊ शकते; जाणून घ्या

by nagesh
Sodium Deficiency Symptoms | these symptoms decrease the level of sodium in body

सरकारसत्ता ऑनलाइन – Sodium Deficiency Symptoms | निरोगी शरीरासाठी सर्व पोषक घटक सेवन करणे खूप महत्वाचे आहे. कोणतेही पोषक द्रव्य कमी-अधिक प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. असाच एक पोषक घटक म्हणजे सोडियमही. सोडियम (Sodium) हा इलेक्ट्रोलाइटचा एक प्रकार आहे जो आपल्या रक्तात आढळतो. त्यामुळे शरीरातील पेशींमधील पाण्याचे प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते. हे एक पोषक तत्व आहे जे हृदयाच्या पेशी आणि मूत्रपिंडाच्या कार्यास योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. रक्तातील सोडियमचे प्रमाण (Sodium Level) कमी झाल्यास हायपोनाट्रेमिया (Hyponatremia) नावाचा आजार होऊ शकतो (Sodium Deficiency Symptoms).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हायपोनाट्रेमिया म्हणजे काय (What Is Hyponatremia) ? :
हायपोनाट्रेमियाचा अर्थ वैद्यकीय भाषेत असा आहे की – रक्तामध्ये सोडियमचे प्रमाण कमी आहे. जास्त पाणी प्यायल्याने ती व्यक्ती हायपोनाट्रेमियाची शिकार होऊ शकते. जास्त पाणी प्यायल्याने शरीर सोडियम डायलाइज्ड (Sodium Dialyzed) होते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू लागते आणि शरीरातील पेशींना सूज येऊ लागते. यामुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवतात (Sodium Deficiency Symptoms).

सोडियम कमी होण्याची लक्षणे कोणती आहेत (What Are The Symptoms Of Sodium Deficiency) ?

डोक्याला वेदना होत आहे.

मळमळणे किंवा उलट्या होणे.

थकवा येणे, घसा वारंवार कोरडा पडणे, शरीरात ऊर्जा नसणे.

चिडचिडेपणा वाढतो.

स्नायू कमकुवत होणे, स्नायू आकुंचन पावणे.

कोमात जाण्याची भिती.

जास्त पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरात सोडियमची कमतरता देखील होऊ शकते.

जरी आपल्या शरीरात अँटी-लघवीचे प्रमाण वाढवणारा संप्रेरक बनविला जात असेल तरीही आपल्या शरीरातील सोडियम कमी असू शकते.

हार्मोनल बदलांमुळे शरीरात सोडियमचीही कमतरता असते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Sodium Deficiency Symptoms | these symptoms decrease the level of sodium in body

हे देखील वाचा :

Drinking Water Benefits | दिवसभरात प्या ‘इतके’ ग्लास पाणी, जाणून घ्या

Maharashtra Congress | शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे 5 आमदार ‘नॉट रिचेबल’

What Not To Eat Before Sleep | झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचे सेवन करणे हानिकारक आहे, जाणून घ्या

Related Posts