IMPIMP

Sohail Khan Divorce | खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट, आता सोहेल मोडतोय 24 वर्षांचा संसार

by nagesh
Sohail Khan Divorce | sohail khan divorce seema khan and sohail khan reached bandra court for official divorce proceedings

नवी दिल्ली : वृत्त संस्थाSohail Khan Divorce | अरबाज खाननंतर (Arbaaz Khan) आता खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट होणार आहे.
सोहेल खान (Sohail Khan) नेही पत्नी सीमा खान (Seema Khan) पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून दोघेही नुकतेच वांद्रे कोर्टात (Bandra
Court) स्पॉट झाले होते. जिथे दोघेही कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याच्या कामासाठी आले होते. वृत्तानुसार, सोहेल आणि सीमा यांच्या नात्यात बराच
काळ तणाव होता आणि त्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (Sohail Khan Divorce)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सोहेल आणि सीमाचे नाते तुटले

अभिनेता सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान आता अधिकृतपणे वेगळे होत आहेत. या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते वांद्रे कोर्टातून बाहेर पडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सीमा घाईघाईने कोर्टातून बाहेर पडताना दिसत आहे, तर दुसरीकडे सोहेल अगदी आरामात नंतर बाहेर पडताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Sohail Khan Divorce)

घटस्फोटाच्या प्रकरणामुळे लोकांना धक्का

सोहेल खान आणि सीमा खान यांनी 1998 मध्ये विवाह केला होता. सोहेल आणि सीमा यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सीमा सोहेलपासून वेगळी राहत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण दोघांचा घटस्फोट होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. लग्नानंतर इतक्या वर्षांनी अचानक असा घटस्फोट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अरबाजनंतर आता सोहेल

सोहेल खानपूर्वी त्याचा मोठा भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) नेही त्याची पत्नी मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतला आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांनी त्यांचे 18 वर्षांचे वैवाहिक जीवन थांबवून स्वत:साठी वेगवेगळे मार्ग निवडले आणि आता सोहेल मोठ्या भावाच्या मार्गावर चालत आपले लग्न मोडून स्वत:साठी वेगळा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा खान व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अशी त्यांची आहे प्रेमकथा

सोहेल खान (Sohail Khan) आणि सीमा सचदेव Seema Sachdev) यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटासारखी आहे. दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले. धर्म भिन्न असल्यामुळे लग्नात अडचण आली. सीमा घरातून पळून जाऊन सोहेलकडे गेली आणि मौलवीचेही लग्नासाठी अपहरण करण्यात आले होते, मात्र 24 वर्षांनंतर या लग्नाचा रंग फिका पडला आहे, आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title : Sohail Khan Divorce | sohail khan divorce seema khan and sohail khan reached bandra court for official divorce proceedings

हे देखील वाचा :

Load Shedding in Maharashtra | ‘महाराष्ट्रात भारनियमन होणार नाही’ – ऊर्जामंत्री नितीन राऊत

SIP Calculation | केवळ 5000 रुपये करा मासिक गुंतवणूक, दरमहिना मिळतील 35000 रुपये; पहा कॅलक्युलेशन

Sayaji Hotels | सयाजीचा होतोय महाराष्ट्रभर विस्तार औरंगाबादमध्ये नवीन एनराईज हॉटेल सुरू

Related Posts