IMPIMP

Solapur Crime | धक्कादायक! मोहोळ तालुक्यातील नवोदय विद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, नातेवाईकांचा रास्ता रोको

by nagesh
Pune Crime | young man committed suicide by hanging himself after getting fed up with money laundering in indapur of pune district

सोलापूर :  सरकारसत्ता ऑनलाइनसोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील जवाहर नवोदय महाविद्यालयात (Jawahar Navodaya College, Pokharapur) एका बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (12 th student commits suicide) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्याने वसतिगृहातील बाथरुममध्ये (bathroom) नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे (Solapur Crime) कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी (Mohol police) घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मुलाने आत्महत्या केल्यावर आम्हाला का नाही बोलावले असे म्हणत शवविच्छेदन करण्यास विरोध करुन नातेवाईकांनी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

देवानंद ज्ञानेश्वर भोसले Devananda Dnyaneshwar Bhosale (वय-17 मूळ रा. मांगी, ता. करमाळा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. देवानंद हा सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे केंद्र शासना मार्फत चालवण्यात येणारे जवाहर नवोदय महाविद्यालयात शिकत होता. या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्रता परीक्षा पास करावी लागते. सध्या या महाविद्यालयात 350 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी देवानंद हा एक होता. (Solapur Crime)

सोमवारी रात्री 8.30 वाजता जेवण विभागात हजेरी घेतल्यानंतर देवानंद गैरहजर असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच त्याच्या मित्रांना देवानंदच्या रुमवर बोलवण्यासाठी पाठवले. तेव्हा तो रूम मध्ये नसून बाथरुम बंद असल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी रुमच्या दिशेने धाव घेत बाथरुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा देवानंदने गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात (Mohol Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

देवानंदच्या नातेवाईकांनी या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला आहे.
शिक्षकांवर गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी करत त्यांनी देवानंदच्या शवविच्छेदनाला विरोध केला.
तसेच मोहोळ मधील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको केला.
त्यामुळे या ठिकाणी काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

Web Title :- Solapur Crime | solapur class 12 student commits suicide in school bathroom in mohol solapur district

हे देखील वाचा :

Earn Money | तुमच्याकडे आहे दरमहिना 60 हजार रुपये कमावण्याची संधी, घरबसल्या सुरू करा आपला व्यवसाय; जाणून घ्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 42 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sangli Crime | पतीपासून वेगळं राहणार्‍या 31 वर्षीय महिलेचा ‘घात’, कालव्याशेजारी मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

Related Posts