IMPIMP

Solapur Crime | धक्कादायक ! पत्नीला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं; मग साडीने घेतला गळफास

by nagesh
Solapur Crime | solapur hotelier commits suicide by hanging self to fan with saree crime news

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Solapur Crime | सोलापूर जिल्ह्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Solapur Crime) समोर आली आहे. पत्नीला व्हिडीओ कॉल (Video Call) करत पतीने आत्महत्या केली आहे. फॅनला साडी आणि बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. राजकुमार दत्तात्रय ढेपे (Prince Dattatraya Dhepe) (वय 49) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही घटना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरातील फत्तेसिंह चौकातल्या साहिल पॅलेस जवळ रविवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेची नोंद अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये (Akkalkot North Police Station) झाली आहे. मृत राजकुमार ढेपे हे स्वामी समर्थ मंदिर परिसरात हॉटेल कृपासिंधू या नावाचे हॉटेल चालवत होते. आत्महत्येपूर्वी पत्नी जयश्री ढेपे (Jayashree Dhepe) यांना व्हिडीओ कॉल करून मी आत्महत्या करत आहे, असं त्यांनी सांगितले आणि आत्महत्या केल्याचा आरोप आहे. असं अक्कलकोट उत्तर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती आहे. (Solapur Crime)

दरम्यान, व्हिडिओ काॅल झाल्यानंतर पत्नीने घरातील बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता, पतीने बेडरूममधील फॅनला साडी व बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. त्यानंतर या घटनेबाबत माहिती आपल्या मुलाला दिली. तेव्हा मुलगा आणि शेजा-यांनी मिळून मृतदेह खाली उतरवला. यानंतर त्यांना खाजगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या का केली? याबाबत माहिती समोर आली नसून या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक शेख (Police Naik Sheikh) करीत आहेत.

Web Title : Solapur Crime | solapur hotelier commits suicide by hanging self to fan with saree crime news

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | मैत्रिणीच्या घरी बोलवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

UPSC Final Result 2021 | युपीएससीचा निकाल जाहीर ! प्रियवंदा म्हाडदळकर महाराष्ट्रातून पहिली; उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांकडून अभिनंदन

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसावर पुणे एसीबीकडून FIR

Related Posts