IMPIMP

Sore Throat | हिवाळ्यात वाढली घशात ‘खवखव’, तर ‘या’ 9 देशी वस्तूंनी मिळेल ताबडतोब आराम; जाणून घ्या

by nagesh
Throat Cancer | does your voice changes in throat cancer know other symptoms and prevention

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – हवामान बदलण्याने घशात खवखव (Sore throat) होणे एक सामान्य समस्या आहे. यामुळे घशात वेदना, खाज आणि जळजळ जाणावते. घशात खवखवीमुळे काहीही गिळण्यास त्रास जाणवतो. मात्र, ही काही गंभीर समस्या नाही, परंतु यामुळे खाण्या-पिण्यापासून झोपण्यापर्यंतचा त्रास होतो. काही घरगुती पद्धतीने घशाच्या खवखवीत (Natural Remedies for Sore Throat) आराम मिळू (Sore Throat) शकतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

1. मध (Honey) –

मध चहासोबत किंवा केवळ मध घेतल्यास ही समस्या दूर होते. मधामुळे जखम वेगाने भरते. यामुळे घशाची खवखव लवकर बरी होते.

2. मीठाचे पाणी (Salt water) –

ग्लासभर गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ टाका, या मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो. दर 3 तासांनी हे करा.

3. कॅमोमाईलचा चहा (Chamomile tea) –

कॅमोमाईलचा चहा घेतल्याने घशाच्या खवयव दूर होते. इम्यून सिस्टम मजबूत होते.

4. पुदीना (Peppermint) –

पुदिन्याचे तेल (Peppermint oil) घशाची खवखव दूर करते. तोंडाची दुर्गंधी दूर होते. हे तेल नेहमी ऑलिव्ह, ऑलमंड किंवा खोबरेल तेलासोबत मिसळून वापरावे.

5. बेकिंग सोड्याच्या गुळण्या (Baking soda gargle) –

1 कप गरम पाण्यात 1/4 चमचा बेकिंग सोडा आणि 1/8 चमचा मीठ टाकून दर तीन तासांनी गुळण्या करा.

6. मेथी (Fenugreek) –

मेथीचा चहा घशाच्या खवखवीवर नैसर्गिक उपाय आहे. घशात सूज निर्माण करणारे बॅक्टेरिया मेथी मारते. गरोदर महिलांनी सेवन करू नये.

7. मुलेठी (Licorice root) –

घशाच्या खवखवीत मुलेठीच्या मुळांचा वापर करतात. गुळणी करण्याच्या पाण्यात हे मिसळावे. गरोदर आणि स्तनदा मातांनी हा उपाय करू नये.

8. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर (Apple cider vinegar) –

एक कप पाण्यात 1 ते 2 मोठे चमचे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळा आणि या पाण्याने गुळण्या करा. हे एका तासात दोन वेळा करा.

9. लसून (Garlic) –

घशात खवखव असेल तर लसणाची पाकळी चोखणे एक जुना आणि परिणामकारक उपाय आहे. मात्र, ती खाल्ल्यानंतर ब्रश करा अन्यथा श्वासाचा दुर्गंधी वाढू शकते. (Sore Throat)

Web Title :- Sore Throat | natural remedies for sore throat salt water garlic honey winter care

हे देखील वाचा :

Atal Pension Yojana मध्ये ऑनलाइन उघडू शकता खाते, PFRDA ने सुरू केली नवी सर्व्हिस

Pune Traffic Jam | पुणे शहर वाहतूक पोलिस नियोजनात ‘फेल’ ! शहरभरातील वाहतूक कोंडीमुळे ऐन दिवाळीत पोलिसांच्या नावाने ‘शिमगा’

Pune Crime | पुण्यात भंगार व्यवसायिकाला अपहरण करत बेदम मारहाण; पोलिसांनी केलं ‘हे’ काम अन्…

Related Posts