IMPIMP

Special Session Of Parliament | संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? सभापती कोण?; जाणून घ्या

by sachinsitapure

Special Session Of Parliament | संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? सभापती नेमके कोण असणार? याबाबत सध्या सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे. संसदेचे विशेष अधिवेशन हे २४ जून ते ३ जुलै या कालावधीत होऊ शकेल असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, १८ व्या लोकसभेसाठी नवनिर्वाचित खासदार २४ आणि २५ जून रोजी शपथ घेऊ शकतात. याशिवाय २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी केंद्र सरकारकडून सर्वप्रथम खासदाराचे नाव प्रस्तावित केले जाईल. विरोधकांनी सरकारचा प्रस्ताव एकमताने मान्य केल्यास निवडणुका होणार नाहीत. तसे न झाल्यास विरोधकही आपल्या बाजूने उमेदवार उभे करू शकतात.

संसदेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेससह इतर विरोधी पक्ष अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला कोंडीत पकडू शकतात. अलीकडेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ( (नीट) वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या वादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता आणि ते संसदेत विद्यार्थ्यांचा आवाज बनतील असे म्हटले होते.

Related Posts