IMPIMP

SPPU News | पुणे विद्यापीठात भोजनासाठी विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजावे लागणार

by nagesh
SPPU News | Celebrating 'World Intellectual Property Day' at Savitribai Phule Pune University

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध भोजनगृहामध्ये भोजन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 टक्के (SPPU News) अधिक रक्कम द्यावी लागणार आहे. कारण जेवण महागले असून, सर्वच पदार्थांच्या किमती वाढत आहेत. हे वाढीव दर येत्या नवीन वर्षाच्या 1 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी (SPPU News) विरोध केला आहे. भोजन दरवाढीवर विद्यापीठातील वातावरण तापणार असे दिसत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संपूर्ण विद्यापीठ परिसरातील भोजनगृहातील मर्यादित शाकाहारी भोजन थाळीचे दर,
मासिक भोजनगृह सदस्यांना 38 रुपये (SPPU News) प्रतिथाळी होणार आहे,
तर मासिक भोजनगृह सदस्य नसलेल्यांना हा दर 47 रुपये प्रतिथाळी असणार आहे.
38 रुपये थाळी यात प्रतिवर्षी 1 रुपयाने वाढ करण्यात येते. त्यामुळे इतर भोजनथाळीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठातील भोजनदरात वाढ करण्यात आली आहे. परंतु, ठरवून दिलेले पदार्थ विद्यार्थ्यांना मिळत नाहीत.
याबाबत वारंवार कुलसचिव यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यांना अनेकवेळा निवेदनदेखील देण्यात आले आहे.
तरीही भोजनदरांत वारंवार वाढ केली जात आहे हे चुकीचे आहे.
त्यामुळे ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि नियमावलीनुसार भोजन देण्यात यावे,
असे युवा क्रांती दलाचे कार्यवाह कमलाकर शेटे यांनी नमूद केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- SPPU News | students will have to pay 25 percent extra for food in the Savitribai Phule Pune University

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात तीनवर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; नराधमास अटक

Pune News | ‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून; जी २० परिषदेत यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होतील’ – खासदार विनय सहस्त्रबुद्धे

Related Posts