IMPIMP

SSC HSC Exam 2022 | दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर

by nagesh
Scholarship Examination in Maharashtra | mahahrashtra scholarship examination for 5th and 8th standard students will be held in month of june 2022 examination 2022

सरकारसत्ता ऑनलाइन – SSC HSC Exam 2022 | राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या (SSC HSC Exam 2022) प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर झाल्याचं समोर आलं आहे. 12 वीची प्रात्यक्षिक (Praticle) परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 रोजी दरम्यान होणार आहे. तर 10 वीची परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 यादरम्यान होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान विद्यार्थी संख्या अधिक असल्यानं ऑनलाइन (Online) पद्धतीनं परीक्षा होणार नसून ती ऑफलाइनच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”राज्य शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या (10th-12th Exams) लेखी परीक्षा या ऑफलाईनच होतील,
त्यात कोणताही तुर्तास बदल होणार नाही.” असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याकडून दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आलं होतं.
तसेच, विद्यार्थ्यांनी 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचा (SSC HSC Exam 2022) अभ्यास आणि त्याची तयारी करावी, असं आवाहन देखील त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना केलं होतं.
दरम्यान आता प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलं असल्याने या परीक्षेबाबत तयारी बोर्डाकडून सुरू झाली असल्याचे समजते.

Web Title :- SSC HSC Exam 2022 | the board has announced the schedule of 10th and 12th practical examination

हे देखील वाचा :

Remo D’Souza | रेमो डिसूझाच्या कुटुंबातील सदस्याची आत्महत्या, संपूर्ण कुटुंबला मोठा धक्का

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात वाढ तर, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा भाव

Responsibilities Of WhatsApp Group Admin | जर तुम्ही सुद्धा असाल एखाद्या WhatsApp ग्रुपचे अ‍ॅडमिन तर ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा जावे लागेल जेलमध्ये

Dinkar Raikar Passes Away | ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे दीर्घ आजाराने निधन; DTP ऑपरेटरपासून सुरुवात करुन समूह संपादक म्हणून झाले होते निवृत्त

Pune Corporation | पुण्यातील धनकवडी ट्रक टर्मिनन्सच्या जागेवर ‘ट्वीन टॉवर्स’ ! ‘एका माननीयांनी’ तयार करून घेतलेल्या आराखड्याचे प्रशासनाने केले सादरीकरण

Related Posts