IMPIMP

ST Workers Agitation | पुणे जिल्ह्यात 26 एसटी कर्मचारी निलंबित; राज्यात 918 Suspended

by nagesh
ST Workers Strike | Suspension of 11008 contact ST employees till now! Show cause notice to 2047 persons, 783 dismissed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  राज्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून संप (ST Workers Agitation) पुकारण्यात आला आहे. एसटी महमंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप (ST Workers Agitation) सुरु केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून (MSRTC) कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. महामंडळाकडून राज्यात 918 तर पुणे जिल्ह्यात 26 कर्मचारी निलंबित (employee suspend) केले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप (ST Workers Agitation) पुकारला आहे.
त्यामुळे गावी गेलेल्या लोकांना पुन्हा माघारी येण्यास खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.
याच संधीचा फायदा घेत खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट होऊ लागली होती.
अखेर महामंडळाकडून खासगी वाहनांना (private vehicle) प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली.
त्यांनी एसटीचे दर आकारावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही एसटी कर्मचारी संप मागे न घेता आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

दररोज कोटींचा फटका

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणी साठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असतानाच संपाचे हत्यार उपसले आहे.
राज्यातील जवळपास 120 पेक्षा जास्त डेपोत सध्या संप सुरु आहे.
त्यामुळे एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका बसत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : ST Workers Agitation | 918 employees suspended state and 26 pune district by MSRTC

हे देखील वाचा :

Modi Government | शेतकर्‍यांचे वाढणार उत्पन्न ! मोदी सरकारने इथेनॉलच्या किमतीत 2.55 रुपये प्रती लीटर पर्यंत केली वाढ

Indian Railways | राज्यातील मुखेड, नांदेड, पुर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आणि मलकापुरमधून धावणार ‘ही’ नवी सुपरफास्ट रेल्वे

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 48 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts