IMPIMP

ST Workers Strike | 5 महिन्यांच्या संपामुळे एसटी कर्मचारी कर्जबाजारी; 250 कोटींचे नुकसान

by nagesh
ST Workers Strike | 250 crore employees lost due to st strike with losses of one and a half to four lakhs each

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ST Workers Strike | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण (MSRTC’s Merger With Maharashtra State Government) करावे यासाठी गेल्या पाच महिन्यापासून संप सुरू होता. या संपामुळे एसटी कर्मचारी (MSRTC Workers) कर्जबाजारी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विविध कारणांमुळे सुमारे २५० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून प्रत्येक कर्मचाऱ्याला एक ते चार लाख रुपयांचा फटका बसला आहे. (ST Workers Strike)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कामगार वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक कर्मचारी आहेत की ज्यांचे ग्रॅच्युएटी मिळण्यासाठी २४० दिवस पूर्ण झाले नाहीत. पाच महिने संपावर असल्याने त्यांना पीएफचे व्याजही (Interest On PF Account) मिळणार नाही. तसेच विमा पॉलिसीचे हप्ते (Policy Premium Payment) थकले आहेत. दरम्यान, यासंदर्भात बोलताना एका कर्मचाऱ्याने सांगितले की, उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आदेश दिल्यानंतर कामावर रुजू झालो. मला ५५ हजार रुपये वेतन आहे परंतु संपामुळे २.५० लाख रुपयांचे नुकसान झाले. खर्चासाठी मला मित्रांकडून उसनवारी करावी लागली. (ST Workers Strike)

उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारपर्यंत ८१ हजार ६८३ कर्मचाऱ्यांपैकी ४० हजार २१९ कर्मचारी कामावर उपस्थित होते. अद्यापही ४१ हजार ४६४ जण संपात सहभागी आहेत. आतापर्यंत ११ हजार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे.

एका कर्मचाऱ्याने सांगितले की, २०१९ पासून मी एसटी बँकेतून ५ लाखांचे कर्ज घेतले आहे.
त्यासाठी महिन्याला १० हजार ५०० रुपयांचा हप्ता आहे. गेल्या पाच महिन्यापासून संप सुरू असल्याने हप्ता भरू शकलो नाही.

महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बारणे म्हणाले की,
न्यायालयाच्या निर्णयाने ज्या मागण्या मान्य केल्या आहेत त्या यापूर्वीच परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्य केल्या आहेत.
आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांना खूप मोठी आर्थिक झळ बसणार आहे. त्यामुळे एक माणुसकी म्हणून यातून आर्थिक सहाय्य होईल असा मार्ग निघणे आवश्यक आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कष्टकऱ्यांचे दीड ते दोन कोटी गेले कुठे ?
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांकडून साधारण दीड ते दोन कोटींची रक्कम जमा करण्यात आली होती.
त्यात ११ हजार कर्मचाऱ्यांकडून ५००, तर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांकडून ३०० रुपये घेण्यात आले.
त्याची संख्या ४० हजाराहून अधिक आहे.
त्याची रक्कम अंदाजित दीड ते दोन कोटीहून अधिक असून हे पैसे गेले कुठे असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title :- ST Workers Strike | 250 crore employees lost due to st strike with losses of one and a half to four lakhs each

हे देखील वाचा :

Pune Crime | काळेपडळचा भाई कोण ? सनी हिवाळेच्या खूनप्रकरणात तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

Ramdas Athawale | ‘शरद पवार यांनी कधीच जातीय राजकारण केलं नाही ते तर…’; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

Pune Crime | नोबेल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणार्‍या गुन्हेगार सनी हिवाळेच्या साथीदारांवर गुन्हा दाखल, तिघा सराईतांना अटक

Related Posts