IMPIMP

ST Workers Strike | ‘माझ्या संपकरी एसटी कर्मचार्‍यांनो…विलीनीकरणाचे डोक्यातून काढून टाका’ – अजित पवार

by bali123
Ajit Pawar On MSRTC Workers Strike | ajit pawars last warning to msrtc workers there are so many options

सरकारसत्ता ऑनलाइन ST Workers Strike | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सध्या सुरू आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरेोधकांत अनेक मुद्यावरुन आरोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान दुसरीकडे एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. कामगार विलीनीकरणावर ठाम आहेत. मात्र शुक्रवारी विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विलीनीकरणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण दिलं. ‘सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्ट पूर्ण करता येणार नाही, असे स्पष्ट करीत विलीनीकरणाचा विषय एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC) डोक्यातून काढून टाकावा.’ अस पवार यांनी स्पष्टंच सांगितलं आहे.

विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘सरकारने (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांना भरीव वेतनवाढ केली आहे. अन्य राज्यांच्या समकक्ष वेतन आणले आहे. त्यामुळे आता संप मागे घ्या. शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होताहेत. आमदारांनी आपापल्या भागातील एस. टी. कर्मचाऱ्यांची (ST Workers Strike) समजूत काढून त्यांना कामावर परत येण्यासाठी विनंती करावी, असं आवाहन त्यांनी केलं. त्यावेळी विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

पुढे अजित पवार म्हणाले, ‘एसटी महामंडळाचे कर्मचारी (MSRTC Workers) आपलेच आहेत. पण एका महामंडळाची मागणी मान्य केली, तर उद्या इतर महामंडळांतील कर्मचारी असाच हट्ट धरतील व तो मान्य करणे
कोणत्याही सरकारला शक्य होणार नाही. विलीनीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालय
(Mumbai High Court) अंतिम निकाल देईलच, पण सरकारने बहुतांशी मागण्या
पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे. अन्यथा गिरणी कामगार जसे
देशोधडीला लागले तशी वेळ एसटी कर्मचाऱ्यांवर येऊ नये, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title :- ST Workers Strike | ajit pawar clear ST employee should forget merger of MSRTC in maharashtra Government

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts