IMPIMP

ST Workers Strike | बडतर्फ एसटी कामगारांना पुन्हा कामावर घेणार का ? व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्टंच सांगितलं..

by nagesh
ST Workers Strike | msrtc director shekhar channe inform on how many st bus employee are suspended MSRTC News

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून राज्यभर एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. राज्य सरकार (Maharashtra Government) आणि न्यायालयाने (High Court) सुचना करून देखील संप मिटला नाही. संपकरी कामगार अजुनही विलिनीकरणाच्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान काही एसटी कामगार कामावर आले असले तरी अनेक कामगार अजुन संप करत आहेत. यानंतर एसटी महामंडळाने (MSRTC) अशा कामगारांवर सेवा समाप्ती, बडतर्फ करण्याची कारवाई केली. यानंतर आता मोठी माहिती समोर आली आहे. सेवा समाप्ती, बडतर्फ करण्याची कारवाईबाबत आकडेवारी समोर ठेवत बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असं एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (MSRTC MD Shekhar Channe) यांनी स्पष्टंच सांगितलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”संप सुरू झाला तेव्हा संपावर 92 हजार कर्मचारी होते. त्यानंतर रोजंदारीवर असलेल्या 2 हजार लोकांची सेवा समाप्ती झाली आहे. 13 जानेवारीपर्यंत 3 हजार 100 कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत. साधारणत: या काळात संप केल्याने आणि इतर काही कारणाने आम्हाला 5 हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या. साधारणत: 87 ते 88 हजार कर्मचारी आत्ता संपावर आहेत. यापैकी 26,500 कर्मचारी आत्ता कामावर आहेत.” अशी माहिती शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी दिली. (ST Workers Strike)

बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या पुन्हा वापसीचा काही मार्ग आहे का असा सवाल माध्यमांनी केल्यावर शेखर चन्ने यांनी बडतर्फ कामगारांना पुन्हा सेवेत घेता येत नाही, असं सांगत एक कामगारांना गंभीर इशारा दिला आहे. त्यावेळी ते म्हणाले, ”बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्यासाठी काही प्रक्रिया आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही आधी सांगितलं होतं की बडतर्फ झाल्यावर त्याला कामावर घेता येत नाही. ती तेवढी सोपी प्रक्रिया नाही. म्हणूनच कर्मचाऱ्यांना आमचं आवाहन आहे की अशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्याची वेळ येऊ नये. त्यांना यातून पुढे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रूजू व्हावं. बऱ्याचश्या कर्मचाऱ्यांची कामावर हजर होण्याची इच्छा आहे. ते रुजू होताहेत. सध्या महाराष्ट्रात सकारात्मक चित्र दिसून येत आहे.” असं ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

750 खासगी चालक कंत्राटी पद्धतीने ?
शेखर चन्ने म्हणाले, ”एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तर त्यांच्यावर कारवाई करणार नाही.
750 खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत, ज्यांचे वय 62 पेक्षा कमी आहे, जे फिट आहेत त्यांना काही काळ कामासाठी घेणार आहोत.
एसटी सेवा प्रवाशांना मिळावी हा खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्या मागचा हेतू आहे.”

Web Title : ST Workers Strike | msrtc director shekhar channe inform on how many st bus employee are suspended MSRTC News

हे देखील वाचा :

The Great Resignation | नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्यात सातत्याने वाढ, IT कंपन्या ‘अस्वस्थ’

Post Office PPF Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना ! फक्त 417 रुपये गुंतवा अन् बना करोडपती

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5480 पेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts