IMPIMP

ST Workers Strike | आम्ही उद्यापर्यंत वाट बघू, अन्यथा आंदोलक कर्मचाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावं लागेल; अनिल परब यांचा इशारा

by nagesh
Anil Parab | Maharashtra government to clear stand on msrtc workers strike before the end of ongoing budget session says anil parab

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) आज संपण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आंदोलनाचे नेतृत्व आपल्या घेत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांनी विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन (ST Workers Strike) सुरुच ठेवण्याचा इशारा आज (गुरुवारी) दिला आहे. तर दुसरीकडे सरकारने पगारवाढीची (Salary Hike) घोषणा केल्यानंतर ही जे कामगार उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू झाले नाहीत त्यांना कडक कारवाईला (Strict Action) सामोरे जावे लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

तर निलंबन मागे घेऊ

अनिल परब यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, आम्ही आमचा निर्णय जाहीर केला आहे.
ज्या कामगारांना तो निर्णय मंजूर असेल ते कामगार कामावर येतील.
ज्यांना मंजूर नसेल त्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागेल.
कामगारांनी कोणाची डिलरशीप स्वीकारावी हा त्यांचा प्रश्न आहे.
फक्त मी त्यांना एकच सांगू इच्छितो, तुटेपर्यंत ताणू नये.
एकदा तुटले तर जोडणार नाही. आता किती कामगार येतील यावर कारवाई ठरवू.
निलंबित (Suspend) झालेले कामगार उद्या कामावर आले तर त्यांचे निलंबन मागे घेऊ, असे परब यांनी सांगितले.

खोत, पडळकरांनी आंदोलन मागे घेतले

विलीनीकरणाच्या (Merged) बाबतीतील भूमिका स्पष्ट केली आहे. पगारवाढीच्या बाबतीत देखील सर्व लेखाजोखा मी कालच्या पत्रकार परिषदेत मांडलेला आहे.
आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्याशी काल दिवसभर झालेल्या चर्चे अंती आम्ही या सगळ्या गोष्टी मांडल्या.
त्यामुळे आज त्यांनी सरकारच्यावतीने जे काही मांडले गेलं ते कर्मचाऱ्यांना सांगून आपलं आंदोलन (Agitation) मागे घेतले आहे, असेही परब यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

उद्या सकाळपर्यंत कामावर यावे, अन्यथा…

अनिल परब पुढे म्हणाले, एक गोष्ट नक्की आहे, लढाई कशा पद्धतीने लढायची असते.
मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई थांबवायची असते, असे साधारण संकेत असतात.
काही कर्मचारी (ST Workers Strike) कामावर येऊ इच्छित आहेत. ते आमच्याशी संपर्क साधत आहेत.
सातत्याने ते सांगत आहेत की, आम्हाला कामावर यायचं आहे.
आम्हाला सुरक्षा द्या. आज मी कामगारांना आवाहन केलं आहे जे कामगार गावी गेले आहेत त्यांनी कामावर यावं.
जे मुंबईत आहेत त्यांनी उद्यापर्यंत कामावर यावं.
आम्ही उद्या सकाळपर्यंत किती कामगार येतात, किती येत नाहीत या सगळ्यांचा अभ्यास करु. त्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की कसे पुढे जायचे.

Web Title : ST Workers Strike | shivsena minister anil parab appeal st workers to join duty

हे देखील वाचा :

Shakti Mill Gangrape Case | मुंबई हाय कोर्टाचा निर्णय ! शक्ती मिल गँगरेप प्रकरणातील 3 आरोपींची फाशी रद्द

Pune Crime | पुण्यातील लॉजमध्ये जोडप्याचे नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

Nikki Tamboli | निक्की तांबोळीच्या ‘या’ बोल्ड फोटोशूटमुळं चाहते घायाळ, फोटो व्हायरल

Related Posts