IMPIMP

ST Workers Strike | MSRTC कडून कठोर कारवाई ! संप करणार्‍या 376 कामगारांचं निलंबन

by nagesh
ST Workers Strike | Suspension of 11008 contact ST employees till now! Show cause notice to 2047 persons, 783 dismissed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ST Workers Strike | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) चिघळला आहे. राज्य शासनात (Maharashtra Government) विलिनिकरण करा या जोरदार मागणीसाठी एसटी कामगार आक्रमक झाले आहेत. तसेच यावर समिती स्थापन करून तोडगा काढण्याचे निर्देश हाय कोर्टाकडून (High Court) देण्यात आले आहेत. तरी देखील कामगार आपल्या मागण्यावर ठाम आहेत. सर्वत्र संपही सरूच आहे. यानंतर आता एसटी महामंडळाने (MSRTC) कठोर कारवाईचे पाऊल टाकले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

संपावर असणाऱ्या कामगारांच्या विरोधात एसटी महामंडळाकडून (maharashtra state road transport) निलंबनाच्या कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. महामंडळाने संपावर गेलेल्या 376 कामगारांना निलंबित (Suspended) केलं आहे. यामध्ये राज्यातील 45 आगारातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, राज्य शासनाने जीआर काढून देखील एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करत नाही, तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आडमुठेपणाची भूमिका सोडावी, नागरिकांना वेठीस धरू नका, असे आवाहनही यावेळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, एसटी महामंडळ उद्या सकाळी 10 वाजता संप करणाऱ्या कामगारांविरोधात
न्यायालयात अवमान याचिका (Contempt petition) दाखल करणार आहे.
महामंडळानेही आता कामगारां विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे आज (मंगळवारी) कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होऊ
न शकल्याने उद्या ही याचिका दाखल करण्यात येणार आहे. (ST Workers Strike)

Web Title :- ST Workers Strike | st worker strike msrtc initiation of action against agitation 376 employees suspended

हे देखील वाचा :

Pune ST Workers Strike | पुण्यातील शिवाजीनगरच्या वाकडेवाडीत ST कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 43 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

या Multibagger Stock ने दिला 1100 टक्केपेक्षा जास्त नफा, 10 हजाराचे झाले 1.11 कोटी रुपये; जाणून घ्या

Related Posts