IMPIMP

ST Workers Strike | आतापर्यंत 11008 संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन ! 783 जण बडतर्फ तर 2047 जणांना कारणे दाखवा नोटीस

by nagesh
ST Workers Strike | Suspension of 11008 contact ST employees till now! Show cause notice to 2047 persons, 783 dismissed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ST Workers Strike | गेल्या 70 दिवसापासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. आतापर्यंत साडेदहा हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन (Suspended) करण्यात आले आहे. तर सुनावणीस हजर न राहिलेल्या 700 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. महामंडळाने केलेल्या बडतर्फ कारवाई नंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यासाठी येऊ लागले आहेत, मात्र आता त्यांची परतीची वाट बंद झाली असल्याचे समोर आले आहे. काही कर्मचारी पुन्हा कामावर हजर होण्यासाठी आगारात गेले होते. मात्र मध्यवर्ती कार्यालयाकडून (Central Office) हजर करून घेण्याचे कोणतेही आदेश नसल्याने आगार प्रमुखांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विलीनीकरण मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे (ST Workers Strike) हत्यार उपसले होते. त्यानंतर अनेकवेळा महामंडळाने आणि शासनाने
काही मागण्या मान्य करत सेवेत रुजू होण्याची विनंती केली होती. मात्र, संपकरी आपल्या मागणीवर ठाम राहिले. तर काही कर्मचारी कामावर रुजू झाले.
दरम्यानच्या काळात मंडळाने रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी
महामंडळाने (MSRTC) शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे पतीची
नोकरी गेली. त्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळू लागली. त्यातून सावरण्यासाठी मी स्व खुशीने कामावर रुजू होण्यास गेले मात्र, सोशल मीडियाद्वारे
अश्लील भाषेत टिप्पणी करण्यात आल्याने कामावर हजर झाले नसल्याचे मुंबई विभागातील महिला कर्मचाऱ्यानी सांगितले.

2047 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस –

महामंडळाने कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते, मात्र अपवाद वगळता कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे
महामंडळाने हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 11 हजार 8 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून 783
कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे, तर दोन हजार 47 एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या औरंगाबादमधील एका कर्मचाऱ्याने सांगितल्यानुसार, ‘कुटुंबाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे
आम्ही वारंवार आगारात जाऊन कामावर रुजू करून घेण्याची विनंती केली. मात्र आगार प्रमुखांनी कामावर रुजू करून घेण्यास नकार दिला. कारण
त्यांना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतची सूचना नसल्याचे समोर आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष शेखर चन्ने (Shekhar Channe) म्हणाले की, ‘संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र ते हजर झाले नाही.
त्यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात आली. त्यानंतरही तीन वेळा त्यांना हजर राहण्याची संधी देण्यात आली.
पण तरीही ते रुजू झाले नसल्याने त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु झाली आहे.
त्यामुळे त्यांना आता कामावर हजर होता येणार नाही, असे चन्ने यांनी सांगतिले.

Web Title : ST Workers Strike | Suspension of 11008 contact ST employees till now! Show cause notice to 2047 persons, 783 dismissed

हे देखील वाचा :

Covid Vaccine Child Registration | 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी सुरू झाले आजपासून रजिस्ट्रेशन, Aadhar Card शिवाय सुद्धा करू शकता नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया

PM Vaya Vandana Yojana | निवृत्तीनंतर आधार देईल प्रधानमंत्री वय वंदना योजना, दर महिना मिळेल 9,250 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी करावी गुंतवणूक

Women Health | चाळीशीनंतर महिलांनी रोज करावे अंड्याचे सेवन, कधीही होणार नाही ‘ही’ समस्या

Related Posts