IMPIMP

Stock Market Holiday List | शेअर बाजारामध्ये 3 दिवस व्यवहारांना ‘ब्रेक’, जाणून घ्या का होणार नाही ट्रेडिंग

by nagesh
Stock Market Holiday List | stock market treding closed on these 3 days in august 2022 know big reason here

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाStock Market Holiday List | तुम्ही शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. वास्तविक, या महिन्यात वीकेंड व्यतिरिक्त तीन दिवस शेअर बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. ऑगस्टमध्ये सण (Festivals) सुरू झाले आहेत आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या वेबसाइटवरील सुट्टीच्या यादीनुसार, 9 ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी कोणतेही व्यवहार होणार नाहीत. (Stock Market Holiday List)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यावर्षी मार्केटला 13 सुट्ट्या

बीएसई Stock Market Holiday List नुसार, 2022 मध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्या व्यतिरिक्त 13 सुट्या आहेत. याअंतर्गत 26 जानेवारी रोजी शेअर बाजाराला पहिली सुट्टी होती, तर वर्षातील शेवटची सुट्टी 8 नोव्हेंबर 2022 रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त असेल. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात तीन दिवस व्यवहारांना ब्रेक लागणार आहे. 9, 15 आणि 31 ऑगस्ट रोजी कोणतेही कामकाज होणार नाही. या सुट्ट्यांमध्ये इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. (Stock Market)

या सणांना कामकाज बंद

ऑगस्ट महिना हा विविध सणांचा असतो. या महिन्यात रक्षाबंधन (Raksha Bandhan) सह अनेक मोठे सण आहेत. पण, प्रत्येक सणाला शेअर बाजार बंद राहणार नाही. बीएसईच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, या महिन्याची पहिली सुट्टी आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी आहे. 9 तारखेला मोहरम (Muharram) च्या निमित्ताने शेअर बाजारात सुट्टी असेल. यानंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) मार्केट बंद राहणार आहे, तर 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त मार्केटमधील व्यवहार बंद राहणार आहेत.

ऑक्टोबरमध्ये सुद्धा 3 दिवस सुट्टी

या वर्षातील सर्वात मोठी शेअर बाजाराची सुट्टी एप्रिल महिन्यात होती, तेव्हा व्यवहार चार दिवस बंद होते.
यानंतर ऑगस्ट व्यतिरिक्त ऑक्टोबर महिन्यातही शेअर बाजाराला तीन दिवस सुट्टी असेल.
ऑक्टोबर 2022 मध्ये, अनुक्रमे 5, 24 आणि 26 तारखेला दसरा (Dussehra), दिवाळी लक्ष्मीपूजन (Diwali Laxmi Pujan)
आणि दिवाळी बलिप्रतिपदा (Diwali Balipratipada) या सणांच्या निमित्ताने शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

24 ऑक्टोबरला होईल मुहूर्त ट्रेडिंग

दिवाळीनिमित्त शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) ची परंपरा आहे.
यावेळी मुहूर्त ट्रेडिंग 24 ऑक्टोबर 2022 रोजी (दिवाळी-लक्ष्मी पूजन) असेल.
यानंतर 8 नोव्हेंबर 2022 रोजी गुरु नानक जयंती (Gurunanak Jayanti) निमित्त शेअर बाजाराला फक्त एक दिवस सुट्टी असेल.
2022 मधील शेअर बाजारातील ही शेवटची सुट्टी असेल.

Web Title : – Stock Market Holiday List | stock market treding closed on these 3 days in august 2022 know big reason here

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! प्रेम प्रकरणातून तरुणाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या, 8 महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

RBI Action On Co-Op Banks | RBI ची कडक कारवाई ! आता महाराष्ट्रातील 3 बँकांसह ‘या’ 8 को-ऑपरेटिव्ह बँकांना दणका, ठोठावला लाखो रूपयांचा दंड

Pune Crime | परदेशात नोकरीच्या आमिषाने महिलेने 10 जणांना फसवलं, समर्थ पोलिस ठाण्यात FIR

Related Posts