IMPIMP

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

by pranjalishirish
story central government reply on government employees will be given 3 days off in a week

नवी दिल्ली : देशात मागील काही काळापासून याबाबत चर्चा सुरू आहे की, आगामी काळात लोकांना आठवड्यात केवळ चार दिवस नोकरी करावी लागेल. केंद्र सरकार Central Government यासाठी योजना बनवत आहे. बुधवारी संसदेत याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना केंद्रीय कामगार मंत्र्यांनी सांगितले की, कार्यालयांसाठी आठवड्यात चार दिवस किंवा 40 तासाच्या कामाची व्यवस्था सुरू करण्याची केंद्राची कोणतीही योजना नाही.

WhatsApp युजर्स, सावधान ! ‘हा’ मेसेज तुमच्यासाठी ठरू शकतो अडचणीचा

कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत लेखील उत्तरात सांगितले की, सध्या केंद्र सरकारच्या Central Government  अधिकार्‍यांसाठी आठवड्यात चार दिवस किंवा 40 तासाची व्यवस्था लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

Video : लिलावती रुग्णालयात पोहोचला ‘भाईजान’ सलमान ! जाणून घ्या नेमकं कारण काय

त्यांनी म्हटले की, चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारसीच्या आधारावर, आठवड्यात पाच दिवस आणि भारत सरकारच्या नागरी प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रतिदिन साडे आठ तास काम केले जाते. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाने सुद्धा आपल्या शिफारसीत ते कायम ठेवले.

Ind vs Eng : दुसर्‍या वनडेच्या पूर्वी टीम इंडियाला झटका, सीरीजमधून बाहेर गेला ‘हा’ स्टार फलंदाज

यापूर्वी वृत्त होते की, नव्या कायद्यांतर्गत आगामी काळात आठवड्यात तीन दिवस सुट्टीची तरतूद शक्य आहे. कामगार मंत्रालयानुसार केंद्र सरकार Central Government आठवड्यात चार कामाचे दिवस आणि त्यासोबत तीन दिवसाची पगारी सुट्टीचा पर्याय देण्याची तयारी करत आहे. यावरून अंदाज वर्तवला जात होता की, नव्या कामगार कायद्यातील नियमांमध्ये हा पर्याय सुद्धा ठेवला जाईल, ज्यावर कंपनी आणि कर्मचारी आपसातील सहमतीने निर्णय घेऊ शकतात. नव्या नियमांतर्गत सरकारने कामाचे तास वाढवून 12 पर्यंत करण्याचा समावेश केला आहे. काम करण्याच्या तासांची आठवड्यात कमाल मर्यादा 48 आहे, अशावेळी कार्यालयीन दिवसांची कक्षा पाचवरून कमी होऊ शकते.

Also Read : 

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

‘सत्य जरा जास्त टोचतं’ अमृता फडणवीसांवर भाई जगतापांचा पलटवार

Related Posts