IMPIMP

Sudhir Mungantiwar | ‘शिवसेनेची टीका म्हणजे स्वत:कडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही हे दाखवण्यासारखे’ – सुधीर मुनगंटीवार

by nagesh
Sudhir Mungantiwar | bjp leader and minister sudhir mungantiwar replied shiv sena uddhav thackeray over criticism over cabinet expansion

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात नवीन सरकार झाल्यापासून काही ना काही कारणांवरुन विरोधक सतत टीका करत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) एकाही महिला नेत्याला स्थान न दिल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला (State Government) घेरलं होतं. त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी घेतलेल्या एका निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून (Shivsena) सातत्याने होत असलेल्या टीकेचा खरपूस समाचार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी घेतला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, हॅलो शब्द 18 व्या शतकात आला. आश्चर्य व्यक्त करणे असा त्याचा अर्थ होतो. इंग्रजांची ही आठवण पुसून काढली पाहिजे. आपल्या मराठी पुस्तकात वंदे मातरमचे (Vande Mataram) सुंदर वर्णन करण्यात आले आहे. देवाच्या मुखातून निघालेल्या वेद मंत्रा पेक्षा देशभक्ताच्या ओठातून निघालेले वंदे मातरम प्राणप्रिय आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही

शिवसेनेकडे जी खाती होती ती त्यांच्याकडे आहेत. भाजपने (BJP) चांगली खाती घेतली असे म्हणण्याला काही अर्थ नाही. भाजपकडे जी खाती आहेत, ती शिवसेनेने विचारपूर्वक, चिंतन करुन काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीला (NCP) दिलेली खाती आहेत. तेव्हा तेही सरकारमध्ये दुसऱ्या भूमिकेत होते आणि सध्या आम्ही आहोत. शिवसेनेने यावर टीका करणे म्हणजे आपल्याकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही म्हणत निंदा करुन घेण्यासारखे असल्याची बोचरी टीका मुनगंटीवार यांनी केली.

जितेंद्र आव्हाडांवर पलटवार

भारतीय राज्यघटनेने (Constitution of India) दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, असा इशारा देत कोणी काय खावे,
काय घालावे, काय बोलावे हे तुम्ही ठरवणार का ? असा सवाल करत आम्ही तसे म्हटले नाही, तर जेलमध्ये टाकणार का ? अशी विचारणा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी केली होती.
यावर हे अभियान आहे. कोणत्याही व्यक्तीला कायदा करुन आम्ही जेलमध्ये टाकू असे सांगितलेले नाही.
हा आपल्या शिक्षणपद्धतीचाच दोष आहे की, योग्य अर्थ काढण्याची क्षमता आपण विकसित करु शकलो नाही.
हॅलो शब्दाला पर्यायी शब्द म्हणून वंदे मातरम वापरावे इतकेच म्हटले आहे.
यामध्ये श्वास आणि इतके मोठे शब्द वापरण्याची गरज नव्हती, असा पलटवार मुनगंटीवार यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : – Sudhir Mungantiwar | bjp leader and minister sudhir mungantiwar replied shiv sena uddhav thackeray over criticism over cabinet expansion

हे देखील वाचा :

ITR Verification | जर केले नसेल व्हेरिफिकेशन तर रद्द होईल तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न, जाणून घ्या पडताळणीच्या पद्धती

Healthy Heart | हृदयाच्या आजाराची भीती वाटते का? मग शरीरात होऊ देऊ नका या न्यूट्रिएंटची कमतरता

Business Idea | OLA सोबत मिळून घरबसल्या कमावू शकता चांगले पैसे, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

Related Posts