IMPIMP

Sudhir Mungantiwar | बहुमत आहे तर दाखवा, तुम्हाला हात आहेत ना ? की ‘शोले’चे ठाकूर आहात ? – सुधीर मुनगंटीवार

by nagesh
Sudhir Mungantiwar | The stance of Congress has always been against Shivaji and Hindu gods

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमंगळवारी रात्री भाजप (BJP) नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. आज भाजप नेत्यांनी विधिमंडळ सचिव आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Zirwal) यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) त्यांनी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला. बहुमत (Majority) आहे तर एका तासात दाखवू शकता, हात आहेत तर दाखवता येतात, त्यासाठी 30 दिवसांचा अवधी कशाला हवा ? तुम्ही शोलेचे ठाकूर आहात का ? अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुधीर मुनगंटीवार आणि प्रदीप दरेकर (Pradeep Darekar) यांनी विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेत विश्वासदर्शक ठरावाच्या तयारीचा आढावा घेतल्याची माहिती आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार गुरुवारी (दि.30) सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. आजारी आमदारांसाठी वेगळी व्यवस्था करण्याचीही मागणी भाजप नेत्यांनी केली.

अल्पमतातील सरकार आमदारांवर जबरदस्ती का करतेय ? असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, जशी प्रश्नपत्रिका असेल तशी उत्तर पत्रिका देऊ. जे लोक धमक्या, गुंडगिरीची भाषा करत आहेत, त्याबाबत गंभीरतेने लक्ष द्यावं, सर्वांना लोकशाहीचा अधिकार बजावता यावा असेही ते म्हणाले. तुमचे आमदार तुम्हाला टिकवता आले नाहीत, तुम्ही राज्यपालांवर टीका का करता ? असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात कोणाचीही गुंडगिरी चालणार नाही. जे लोक हारले आहेत ते आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले. जनता आणि आमदारांचं न ऐकता उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना जीवन अर्पण केलंय, असा हल्लाबोल मुनगंटीवार यांनी चढवला.

दरम्यान, राज्यपालांना 7 अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांचे पत्र मिळाले आहे.
या सर्वांनी मिळून महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पाठिंबा काढून घेतल्याचे पत्रात म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूला भाजपने देखील राज्यपालांना पत्र लिहून सरकारने बहुमत सिद्ध करावे अशी मागणी केली आहे.
भाजपच्या मागणीनंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sudhir Mungantiwar | bjp leader sudhir mungantiwar challenges shivsena to face floor test in vidhansabha maharashtra political crisis

Related Posts