IMPIMP

Sudipto Sen | ‘द केरळ स्टोरी’च्या दिग्दर्शकाची नदाव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया

by nagesh
Sudipto Sen | the kerala story director sudipto sen says nadav lapid controversial statement was unethical

सरकारसत्ता ऑनलाईन – Sudipto Sen | गोव्यातील चित्रपट महोत्सवानंतर विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपट महोत्सवात नदाव लॅपिड या ज्युरी मेंबरने द काश्मीर फाइल्स चित्रपटावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे. लॅपिड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक स्तरावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सुदीप्तो सेन हेही याच चित्रपट महोत्सवात ज्युरी मेंबरपैकी एक होते. सुदीप्तो सेन यांनीदेखील लॅपिडचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले आणि आता पुन्हा एकदा त्यांनी यावर भाष्य केले आहे. (Sudipto Sen)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या चित्रपट महोत्सवात सुदीप्तो हेदेखील ज्युरी म्हणून सहभागी झाले होते. सुदीप्तो यांच्या मते ज्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही, त्या चित्रपटाबद्दल वक्तव्य करणे हे चुकीचे आहे. अशा या वक्तव्यावर टिप्पणी करत हे वैयक्तिक वक्तव्यच आहे, असेही ते म्हणाले. (Sudipto Sen)

सुदीप्तो हे एएनआयशी संवाद साधताना म्हणाले की, “जुरी बोर्डना ज्या चित्रपटाचे सिलेक्शन झाले त्याच चित्रपटाबाबत बोलण्याचा अधिकार असतो. ज्या चित्रपटांना पुरस्कार मिळाला नाही अशा चित्रपटांबाबत वक्तव्य करण्यास मनाई असते. आमच्यापैकी कोणत्या ज्युरीने असं केले असेल तर माझ्या मते ते अनैतिकच आहे. जेव्हा आमच्याकडे 22 चित्रपट आले त्यातील आम्ही पाच निवडक चित्रपटांना पुरस्कार दिला आणि त्या चित्रपटांमध्ये विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट नव्हता, त्यामुळे त्यांच्यावर बोलणे टिप्पणी करणे हे अनैतिक आहे”.

सुदीप्तो म्हणाले, “लॅपिड यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण चित्रपट महोत्सवाला गालबोट लागले आहे.
या एका कारणामुळे हा चित्रपट महोत्सव सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे”.
सुदीप्तो यांनी दिग्दर्शित केलेला ‘केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला,
तर हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.
हा चित्रपटदेखील काश्मीर फाइल्स या चित्रपटाप्रमाणेच एका वादग्रस्त घटनेवर भाष्य करणारा आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sudipto Sen | the kerala story director sudipto sen says nadav lapid controversial statement was unethical

हे देखील वाचा :

Maharashtra State Women’s Commission | जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाविराेधात तक्रार; घटनेवर राज्य महिला आयोगाने…

Pune MNS | पुण्यात मनसेला मोठा धक्का ! 400 मनसे कार्यकर्त्यांचे राजीनामे, वसंत मोरेही पक्ष सोडणार?

D. Pharmacy | डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर

Solapur Crime | गांजातस्करांची नवी युक्ती; हैदराबादमधून आलेला गांजा पुणे कस्टमकडून जप्त

Related Posts