IMPIMP

Sujay Vikhe Patil | ‘शिवसेना आणि राष्ट्रवादीने न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी’

by nagesh
MP Sujay Vikhe-Patil | ncp betrayed shivsena in rajya sabha election 2022 says bjp mp sujay vikhe patil

सरकारसत्ता ऑनलाइन -Sujay Vikhe Patil | देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या (Election) निकालात (Result) भाजपने (BJP) चार राज्यात यश मिळवलं आहे. तर पंजाबमध्ये (Punjab) अरविंद केजरीवालांच्या (Arvind Kejriwal) आम आदमी पक्षाने (AAP) जादू केली आहे. यामध्ये मात्र काँग्रेसचा (Congress) सुफडा साफ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे खासदार सुजय विखे – पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. या कार्यक्रमाला भाजप नेते राधाकृष्ण विखे – पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष लाचार बनला असून राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेने न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी होत आहे. काँग्रसने आता 40 चे शून्य होण्याची वाट पाहावी आणि नवी सुरूवात करावी, असं सुजय विखे – पाटील यांनी म्हटलं आहे. गोव्यामधील निकालावरूनही विखे पाटलांनी शिवसेनेवर टीका केली. जे प्रभारी राज्यात रोज बोलतात त्यांना पाहून गोव्याच्या जनतेनं त्यांना नाकारलं आणि शिवसेनेची स्पर्धा नोटाशी होती ते नोटालाही None Of The Above (NOTA) मागे टाकू शकले नाहीत, असं विखे – पाटील म्हणाले. (Sujay Vikhe Patil)

या कार्यक्रमामध्ये बोलताना राधाकृष्ण – विखे पाटील यांनीही शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. शिवसेनेची मंडळी आता करमणुकीचं साधन बनली आहेत. बोलघेवड्या माणसांना पुढं करुन पक्षाची अधोगती होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakeray) यांनी आत्मपरिक्षण (Introspection) करण्याची गरज आहे. भविष्यात शिवसेनेला कुणीही गांभीर्यानं घेणार नाही, अशा शब्दात राधाकृष्ण विखे – पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही शिवेसेनेला धारेवर धरलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, महाराष्ट्रात 2024 भाजपची सत्ता येणार आहे, शिवसेनेने (Shivsena) अजुनही भाजपसोबत यावं.
काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट बनली आहे. काँग्रेसने गांधी परिवार सोडण्याची गरज असल्याचा सल्ला रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) दिला.

Web Title :-  Sujay Vikhe Patil | sujay vikhe patil criticizes congress over its defeat in assembly elections

हे देखील वाचा :

Pune Corporation | स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2022-23 चे अंदाजपत्रक सादर करण्याचा बांधला चंग

Mini Portable AC | जोरदार विक्री होतेय 400 रुपयांच्या छोट्या AC ची ! मिनिटभरात खोली करतो थंडगार

Pune River Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेवर शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक ! पर्यावरण प्रेमींना प्रकल्पाचे सादरीकरण करून त्यांच्या सूचनांचाही अभ्यास करावा – जलसंपदा मंत्र्यांचे पालिका प्रशासनाला आदेश

Related Posts