IMPIMP

Sunil Raut | उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन हटवणाऱ्यांचा सूड घेणार, ठाकरे गटातील आमदाराचा खळबळजनक इशारा

by nagesh
Andheri East by Election | shivsenas first exam in mumbai after the split andheri east assembly by election announced the whole program is as follows

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेना (Shivsena) फोडून बाळासाहेबांची गद्दारी करण्याचं शुभ काम शिंदे गटाने (Shinde Group) केले आहे. त्यापेक्षा वेगळे चांगले काम काय करणार ? ज्या लोकांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरुन (CM) खाली उतरवलं. त्या सर्वांचा सूड घेणार असल्याचा खळबळजनक इशारा आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी दिला. सुनील राऊत (Sunil Raut) हे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुनिल राऊत (Sunil Raut) म्हणाले, ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यापैकी कुणीही बाळासाहेबांचा उल्लेख केला नाही.
बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. आज बाळासाहेबांना आम्ही उद्धव ठाकरेंच्या रुपात बघतो.
बाळासाहेबांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरुन हटवून वर्षावरुन बाहेर काढलं ही कसली निष्ठा आणि बेगडी प्रेम आहे.
हे उसणं दाखवलेले प्रेम आहे. जनतेचा, मराठी माणसाचा विश्वास शिंदे गटावर नाही आणि ठेवणार नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.

आमच्या पद्धतीने सूड घेणार

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) सर्वांचेच आहेत.
मराठी माणसांचे आहेत. परंतु पक्ष कुणी बांधला ? बाळासाहेबांनंतर भाजपनं (BJP) शिवसेनेची युती तोडली त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना लढली.
शिवसेना बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची आहे. गद्दारी करुन जे मिळवलं त्यात खुश रहा.
आम्हाला आमचं काम करु द्या.
आम्ही उद्धव ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसवणार आणि ज्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन खाली उतरवलं त्यांचा आमच्या पद्धतीने सूड घेणार असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी दिला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Sunil Raut | will take revenge on those who removed uddhav thackeray from the post of chief minister warning of shiv sena mla sunil raut to eknath shinde rebel group

हे देखील वाचा :

Sanjay Rathod On Chitra Wagh | संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा; म्हणाले – ‘मी आत्तापर्यंत शांत होतो, पण आता…’

Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री ?, चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

Former MLA Baburao Pacharne Passed Away | शिरुर-हवेली मतदारसंघाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

Related Posts