IMPIMP

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

by omkar
Parambir Singh | Big relief parambir singh supreme court has ordered not file any chargesheet against parambir singh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारसत्ता ऑनलाइन –  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh.) यांना सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांनी त्यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) मोठा दिलासा मानला जात आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह ( Parambir Singh ) यांना चांगलेच फटकारले.

परमबीर सिंह यांच्याविरूध्द आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, जाणून घ्या प्रकरण

तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात

सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तुम्ही 30 वर्षे पोलीस दलात काम करत आहात. तुम्ही आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहेत. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्हाला आता तुमच्या राज्यावर विश्वास साहिला नाही का ? तुमची मागणी धक्कादायक असल्याचे सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांना सुनावलं आहे.

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्यास परवानगी तर दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली – अजित पवारांनी दिली माहिती

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता (Hemant Gupta) आणि न्यायमूर्ती वी. रामसुब्रमण्यम (V. Ramasubramaniam) यांच्यासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाकडे (Mumbai High Court) जाण्याचा सल्ला दिला आहे. परमबीर सिंह यांच्या बाजूने वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी परमबीर सिंह यांच्यावतीने युक्तीवाद केला.

1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे?

जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये

तुम्हाला फौजदारी कायद्याचे ज्ञान आहे. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर (FIR) तुम्ही स्थगिती द्यावी का ? आम्ही सर्व एफआयआरबद्दल बोलत नाही. एफआयआरसाठी न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे जावा, असं कोर्टानं सांगितलं. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये, असेही म्हटले.

कोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला

महाराष्ट्राला मोठा दिलासा

परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रीरी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात पत्र लिहिल्यानंतर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांनी प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना परमबीर सिंह यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्य़त मिळणार बिनव्याजी कर्ज

Web Title : Supreme blow to Parambir Singh! The Supreme Court rejected the inquiry petition outside Maharashtra

Related Posts