IMPIMP

Supreme Court | CBSE, ICSE बोर्डाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; SC नं विद्यार्थ्यांची रिट याचिका फेटाळली

by nagesh
10th-12th Exams Offline | 10th 12th exams offline only the petition was rejected by the supreme court

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CBSE आणि ICSE बोर्डाच्या दहावी, 12 च्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळे तसेच विद्यार्थ्यांसाठी लस उपलब्ध न झाल्यामुळे ऑनलाइन परीक्षांचा पर्यायही बोर्डाने द्यायला हवा, अशी मागणी करीत सहा विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) रिट याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. ए. एम. खानविलकर (Justice. A. M. Khanwilkar) आणि न्या. सी. टी. रविकुमार (Justice. C. T. Ravi Kumar) यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी झाली. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या असून आता या प्रक्रियेत हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) व्यक्त करत ही रिट याचिका फेटाळली. त्यामुळे या परीक्षा केवळ ऑफलाइन (Offline Exam) पद्धतीनेच होणार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, दोन्ही बोर्डांनी सत्र १ परीक्षा केवळ ऑफलाइन पद्धतीनेच घेणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. यानंतर सीबीएसई बारावीची परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून आयसीएसई बोर्डाची परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.

बोर्डाने ऑक्टोबर महिन्यातच ऑफलाइन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार परीक्षाही सुरु झाल्या आहेत. परीक्षेत कोरोना प्रतिबंध नियमांचे योग्य पद्धतीने पालन होत असून एकूण परिस्थिती पाहता यामध्ये आता हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच परीक्षेदरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी बोर्ड सर्व प्रकारे काळजी आणि उपाय करतील, असा विश्वासही न्यायालयाने (Supreme Court) व्यक्त केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. संजय हेगडे (Sanjay Hegde) म्हणाले की,सुमारे ४० लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
प्रथम सत्रातील हि परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची मुभा मिळायला हवी.
गतवेळी अशा पद्धतीने परीक्षा झाली होती. यावेळीही अशीच पद्धत अवलंबने आवश्यक होते.
ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका उद्भवू शकतो.

सीबीएसई बोर्डाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Solicitor General Tushar Mehta) म्हणाले की,
बोर्डाने ऑफलाइन परीक्षांचे आयोजन करण्यापूर्वी कोरोना प्रतिबंधक सर्व खबरदारी घेतली आहे.
गट वर्षी एका खोलीत ४० विद्यार्थी होते, मात्र या वर्षी हि संख्या १२ आहे.
शिवाय परीक्षेचा अवधीही कमी करण्यात आला असून परीक्षा केंद्रांची संख्याही साडेसहा हजारांवरून पंधरा हजार इतकी केली आहे. (Supreme Court)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Supreme Court | cbse icse 12th exam offline says supreme court

हे देखील वाचा :

Mumbai Crime | राजकीय नेत्यांनी पैसे बुडवल्याने कॅटरिंग व्यावसायिकाची आत्महत्या; परिसरात प्रचंड खळबळ

LIC Jeevan Pragati Scheme | रोज 200 रुपये वाचवल्यास होईल 28 लाखांचा फायदा, जाणून घ्या LIC च्या ‘या’ योजनेची वैशिष्ट्ये

Vikram Gokhale | ‘त्या’ मुलीची अन् माझी ओळख नाही, पण…’ – विक्रम गोखले

Related Posts