IMPIMP

Supreme Court | सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा ! मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार किती ? जाणून घ्या

by nagesh
supreme court has ordered to declare maharashtra municipal elections within two week maharashtra obc reservation

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Supreme Court | मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) एका निर्णयाला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान देण्यात आलं होतं. त्यावरून आज सुप्रीम कोर्टाकडून महत्वपूर्ण निर्वाळा करण्यात आला आहे. जर एखाद्या हिंदू पुरुषाचा विना मृत्यूपत्र मृत्यू (Died) झाला तर त्याच्या मुली (Girls) या त्याने कमविलेली संपत्ती आणि अन्य संपत्ती मिळवू शकतात. असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर (Justice S. Abdul Nazir) आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी (Justice Krishna Murari) यांच्या खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न बनविताच झाला असेल तसेच ती मालमत्ता त्याने स्वत: कमवलेली असेल अथवा वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचे कायदेशीर वारसांमध्ये विभाजन होते. असं खंडपीठाने सांगितलं आहे. दरम्यान, हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांना संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरण कोर्टात होते. याबाबत आज निकाल देण्यात आला. (Supreme Court)

दरम्यान, एका मुलीने वडिलांनी स्वत: कमविलेल्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अन्यकायदेशीर वारसाच्या अनुपस्थितीत खंडपीठाने मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा कसा देता येईल यावर सुनावणी घेतली आहे. दरम्यान, जर हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला आणि त्याची मुलगी ही वारस असेल, तसेच त्या पुरुषाचे भाऊ अथवा भावांची मुले आदींमध्ये जर वडिलोपार्जित संपत्ती वाटली जात असेल तर त्या पुरुषाच्या मुलीला समान हक्क मिळणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Supreme Court | daughter claim fathers property an important decision of the supreme court News

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 3 दिवस पाऊस कोसळणार; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात सरी

Anti Corruption Bureau Kolhapur | 25 लाखाच्या लाच प्रकरणी 2 ‘वजनदार’ पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; संपुर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ

Sharad Pawar | खा. अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भूमिकेवरुन शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Related Posts