IMPIMP

Supreme Court (SC) Bans Two Finger Test | बलात्कार पीडितेवर होणारी ‘टू फिंगर टेस्ट’वर घातली बंदी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

by nagesh
Maharashtra Local Body Election | postponement of local self government elections the hearing will be held in three weeks

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court (SC) Bans Two Finger Test | बलात्कार तसेच लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पीडितेची कौमार्य चाचणी (टू फिंगर टेस्ट) केली जाते. या चाचणीवर आता सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. यापुढे अशी चाचणी कुणी केल्यास त्यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले जाईल (Supreme Court (SC) Bans Two Finger Test). कोर्टाने खंत व्यक्त केली की, आजही आपल्याकडे कौमार्य चाचणी केली जाते हे निंदनीय आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावताना त्यांनी ही टिप्पणी केली (Ban On Two Finger Test).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

खंडपीठाने म्हटले की, या न्यायालयाने वारंवार बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात कौमार्य चाचणी करण्यास नकार दिला आहे. या चाचणीला कोणताही आधार नाही. याउलट पीडित महिलेवर पुन्हा अत्याचार करण्यासारखे असून, तिला अजून एक मानसिक धक्का देण्यासारखे आहे. ही चाचणी घेतली जाऊ नये. लैंगिकदृष्ट्या सक्रीय स्त्रियांवर बलात्कार केला जाऊ शकत नाही या चुकीच्या आधारावर ही चाचणी केली जात आहे. पण सत्यापेक्षा मोठे काही नाही.

बलात्कार आणि लैंगिक शोषणातील पीडितांची कौमार्य चाचणी घेतली जाणार नाही याची काळजी घ्यावी,
असे आदेश न्यायालयाने खंडपीठाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले. खंडपीठाने आणखी एक आदेश दिला तो
म्हणजे, केंद्र सरकारसह राज्य सरकारांनी आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या गाईडलाइन्स सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये पाठवाव्यात.

पीडित महिलांची योग्य चाचणी व्हावी यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचे वर्कशॉप घ्यावे, अशी सूचना खंडपीठाने केली.
वैद्यकीय अभ्यासक्रमांची चाचपणी करण्यास देखील खंडपीठाने सांगितले. जेणेकरुन बलात्कार किंवा लैंगिक शोषण
पीडित महिलांची तपासणी करताना कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य केली जाणार नाही.
तेलंगणा हायकोर्टाच्या (Telangana High Court)निकालाविरुद्ध दाखल अर्जावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने
हे निरीक्षण नोंदवले. तेलंगण हायकोर्टाने बलात्कार प्रकरणी ट्रायल कोर्टाने नोंदवलेली शिक्षा रद्द केली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Supreme Court (SC) Bans Two Finger Test | supreme court bans two finger test in rape and sexual assault cases

हे देखील वाचा :

Tiger Shroff | अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत (VIDEO)

Devendra Fadnavis | गुवाहटीला जाण्यासाठी कडूंनी पैसे घेतल्याचा आरोप करणारे रवि राणा नरमले, फडणवीसांनी केली कानउघडणी!

Related Posts