IMPIMP

Supreme Court | देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यातील वादावर ‘SC’ ने व्यक्त केली चिंता

by nagesh
Supreme Court | army not being fair to women officers says supreme court in hearing on women officers pil regarding promotion

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी घेण्यात आली. यावेळी आपण भारतातच असून 48 तसांत CBI समोर हजर होण्यास तयार असल्याचे सिंह यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सांगितले. त्यानंतर न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यात सुरु असलेल्या वादावर चिंता (Expresses Concern) व्यक्त केली.

अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यात सुरु असलेल्या वादावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) चिंता व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी आम्हाला वेगळं चित्र दिसत असून देशमुख आणि सिंह यांच्यातील लढाई (fight) अधिक उत्सुकतेची बनल्याचे न्यायालयाने म्हटले. परमबीर सिंह आणि संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यात झालेल्या संवादावर देखील न्यायालयाने टिप्पणी केली आहे. पोलीस आयुक्त (Police Commissioner) अशा जबरी कारवाया करत असतील तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल? तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

परमबीर सिंह यांच्या वकिलांनी कोर्टात (Supreme Court) सांगितले की, परमबीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आलेले नाहीत.
परमबीर सिंह कुठे आहेत हे समजत नाही, तो पर्यंत खंडणी प्रकरणात (Ransom case) अटकेपासून संरक्षण दिले
जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं.
परमबीर सिंह चंदीगड (Chandigarh) येथे असल्याची त्यानंतर ते बेल्जियमला (Belgium) निघून गेल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती.

Web Title :- Supreme Court | Supreme court expresses concern over fight between former home minister anil deshmukh and former mumbai cp param bir singh

हे देखील वाचा :

Param Bir Singh | ’मला मुंबईत यायला भीती वाटते’, परमबीर सिंह यांच्या युक्तीवादावर SC ने दिला ‘हा’ आदेश

Alia Bhatt-Tara Sutaria | आलिया भट्टची होणारी भावजय तिच्यापेक्षा ‘हॉट’, पाहा तिचे खास फोटो..!

Nawab Malik In Dubai | वानखेडेंवर आरोप करणारे नवाब मलिक अचानकपणे दुबई दौऱ्यावर का गेले?

Related Posts