IMPIMP

Supreme Court | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द

by nagesh
Shivsena | big relief to shivsena chief uddhav thackeray from supreme court about election commissions notice

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Supreme Court | इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर केंद्राकडून एम्पिरिकल डेटा (Empirical Data) मिळावा यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी गोंधळ माजवला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA) एका वर्षांसाठी निलंबित (Suspended) करण्यात आलं होतं. यानंतर हा विषय थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेला. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला (Thackeray Government) एक मोठा झटका बसला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आलेल्या भाजप आमदारांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षाचे निलंबन असंवैधानिक आणि मनमानी ठरवून रद्द केले. पिठासीन अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं. दरम्यान, कोर्टाने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत निलंबन रद्द केलं आहे. तर, आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा ठराव ‘असंवैधानिक’, ‘बेकायदेशीर’ आणि ‘विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे’ आहे, असं न्यायालयाने नमुद केलं आहे.

‘या’ आमदारांचं झालं होतं निलंबन –

1. गिरिश महाजन (Girish Mahajan)

2. संजय कुटे (Sanjay Kute)

3. अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar)

4. आशिष शेलार (Ashish Shelar)

5. पराग आळवणी (Parag Aalavani)

6. योगेश सागर (Yogesh Sagar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

7. राम सातपुते (Ram Satpute)

8. नारायण कुचे (Narayan Kuche)

9. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)

10. बंटी भांगडिया (Bunty Bhangdiya)

11. हरिष पिंपळे (Harish Pimple)

12. जयकुमार रावल (Jaykumar Rawal)

Web Title: Supreme Court | supreme court quashes one year suspension from the maharashtra legislative assembly of 12 bjp mla

हे देखील वाचा :

TET Exam Scam | राज्यातील तब्बल 7800 शिक्षक बोगस? अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास ! शिक्षण विभागात मोठी खळबळ, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले…

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | मटक्याच्या केसमध्ये कारवाई न करण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना API निंबाळकर आणि महमद अली अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Related Posts