IMPIMP

Supreme Court | ‘आईची काळजी घ्यायला मोठं घर नाही, मोठं मन असावं लागतं’; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

by Team Deccan Express
Maharashtra Local Body Election | supreme court hearing on maharashtra local body election postponed to tuesday

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court | आईची काळजी घ्यायला मोठं घर नाही, मोठं मन असावं लागतं, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एक महत्त्वाचा निर्वाळा केला आहे. मुली आपल्या आईची जबाबदारी घेऊ शकतात. मुलगाही आपल्या आईची भेट घेऊ शकतो. याबाबत मुलाकडून युक्तिवाद करताना वकिलाने सांगितलं की, पुष्पा (Pushpa) आणि गायत्री (Gayatri) आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि मुलींजवळ आईला ठेवायला जागा नाही. यावर सुप्रीम कोर्ट म्हणाले, तुमच्याकडे किती मोठं घर आहे हा प्रश्न नाही तर आईची काळजी घेण्यासाठी तुमचं किती मोठं काळीज आहे, हा मुद्दा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

याप्रकरणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Justice Dhananjay Chandrachud) आणि न्यायमूर्ती सूर्यकांत (Justice Suryakant) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तर, 89 वर्षांची एक ज्येष्ठ महिला वैदेही सिंह (Vaidehi Singh) यांच्या मुली पुष्पा तिवारी (Pushpa Tiwari) आणि गायत्री कुमारने (Gayatri Kumar) सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी दिल्यानुसार, त्यांचा भाऊ आईची काळजी घेत नव्हता. बहिणींना आपल्या भावाला असाही आरोप केला की, भावाने आईची संपत्ती स्वत:च्या नावावर करून घेतली. पुष्पा आणि गायत्रीचं म्हणणं आहे की, तिच्या आईला डिमेन्शिया आहे. त्यामुळे आईची कस्टडी त्यांना दिली जावी. म्हणजे ते आईची काळजी घेऊ शकतील. (Supreme Court)

दरम्यान, महिलेची कोणतीही संपत्ती आता ट्रान्सफर होऊ शकणार नाही.
तसेच आईची कस्टडी मुलींना देण्याच्या प्रश्नावर मुलाकडून मंगळवारपर्यंत उत्तर मागितले आहे.
मुलींना मार्च महिन्यात याचिका दाखल केली होती. ज्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात मुलाने आईला दिल्लीतील गंगा राम रुग्णालयात (Ganga Ram Hospital) दाखल केलं होतं.
यानंतर आईला कोणा अज्ञात ठिकाणी ठेवलं होतं आणि मुलींना भेटायला देत नव्हता.
दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दोन्ही मुलींना आईला भेटू दिलं आहे.

Web Title :- Supreme Court | supreme court said no big house big heart is needed to take care of mother social news

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts