IMPIMP

Supreme Court | ‘कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णाला जीवनाची खात्री देऊ शकत नाहीत’ – सर्वोच्च न्यायालय

by nagesh
Supreme Court | army not being fair to women officers says supreme court in hearing on women officers pil regarding promotion

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मंगळवारी म्हटले की, कुणीही डॉक्टर (Doctor) आपल्या रूग्णाला जीवनाची खात्री देऊ शकत नाही. तो केवळ सर्वोत्तम क्षमतेने उपचार करण्याचा प्रयत्न करू शकतो. जर काही कारणास्तव रूग्ण वाचू शकला नाही, तर डॉक्टरांवर वैद्यकीय निष्काळजीपणाचा दोष लावता येऊ शकत नाही. (Supreme Court)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

जस्टिस हेमंत गुप्ता (Justice Hemant Gupta) आणि जस्टिस व्ही. राम सुब्रमण्यम (Justice V. Ram Subramaniam) यांच्या पीठाने बॉम्बे हॉस्पिटल (Bombay Hospital) आणि वैद्यकीय संशोधन केंद्राची ( Medical Research Center) याचिका स्वीकारत राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाच्या NCDRC (National Consumer Disputes Redressal Commission) ‘त्या’ आदेशाला बाजूला केले ज्यामध्ये वैद्यकीय उपचारातील निष्काळजीपणामुळे रूग्ण दिनेश जायस्वाल (Patient Dinesh Jaiswal) च्या मृत्यूसाठी आशा जायस्वाल आणि इतरांना 14.18 लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

प्रकरणाचे रिकॉर्ड आणि तर्क पाहिल्यानंतर पीठाने म्हटले, हे एक असे प्रकरण आहे जिथे रूग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी सुद्धा गंभीर स्थितीत होता परंतु सर्जरी आणि नव्याने उपचार करूनही रूग्ण जिवंत राहिला नाही तर यास डॉक्टरांची चूक म्हणता येणार नाही.

हे वैद्यकीय निष्कळजीपणाचे प्रकरण होत नाही. पीठाने तक्रारदाराचा हा युक्तिवाद फेटाळला की, सर्जरी एका डॉक्टरकडून करण्यात आली होती यासाठी तो एकटाच रूग्णाच्या उपचाराच्या विविध बाजूंसाठी जबाबदार आहे. पीठाने यास चुकीचा समज म्हटले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

डॉक्टर सतत रूग्णाच्या उशाला उभे राहू शकत नाहीत

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) म्हटले, हॉस्पिटलमध्ये राहण्याच्या दरम्यान एका डॉक्टरकडून रूग्णाच्या बेडजवळ सतत उभे राहण्याची अपेक्षा करणे अतिरेक आहे. या प्रकरणात तक्रारकर्त्याद्वारे हिच अपेक्षा केली जात होती.

एका डॉक्टरकडून योग्य देखभालीची अपेक्षा करता येते. केवळ, डॉक्टर परदेशात गेला होता, यास वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येऊ शकत नाही.

न्यायालयाने हे पाहिले की, तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका टीमने रुग्णाची देखभाल केली. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. पीठाने म्हटले, हे दुखद आहे की, कुटुंबाने आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले. परंतु हॉस्पिटल आणि डॉक्टरांना दोष देता येऊ शकत नाही कारण त्यांनी प्रत्येक वेळी देखभाल केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एक डॉक्टर सर्व समस्यांचे निराकरण करू शकत नाही
पीठाने म्हटले की, सुपर-स्पेशलायजेशनच्या सध्याच्या युगात एक डॉक्टर एका रूग्णाच्या सर्व समस्यांचे निराकरण नाही.
प्रत्येक समस्येला संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ सामोरे जातात.
हॉस्पिटल आणि डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी ठरवणारा आयोगाचा निष्कर्ष कायद्याच्या हिशेबाने टिकाऊ नाही.
अंतरिम आदेशांतर्गत देण्यात आलेल्या पाच लाख रुपयांच्या रक्कमेला सानुग्रह रक्कम मानले जाईल.

काय आहे प्रकरण
22 एप्रिल 1998 ला हॉस्पिटलमध्ये दाखल रूग्ण दिनेश जायस्वाल यांनी 12 जून 1998 ला अखेरचा श्वास घेतला होता.
हॉस्पिटलने उपचारासाठी त्यांच्याकडून 4.08 लाख रुपये घेतले होते. कुटुंबातील सदस्यांचा आरोप होता की,
गँगरीनच्या ऑपरेशननंतर निष्काळजीपणा करण्यात आला, डॉक्टर परदेश दौर्‍यावर होते आणि आपत्कालीन ऑपरेशन थिएटर उपलब्ध नव्हते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Supreme Court | supreme court says no doctor can assure life to his patient

हे देखील वाचा :

Omicron Variant | ‘नायजेरिया’तून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण; महापालिका प्रशासन अलर्ट

Bombay High Court | ‘जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलीला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही’ – मुंबई उच्च न्यायालय

Petrol Price | केजरीवाल सरकारकडून दिल्लीकरांना मोठा दिलासा ! पेट्रोल 8 रूपयांनी स्वस्त, महाराष्ट्रात ठाकरे सरकारकडून अद्याप निर्णय नाही

Related Posts