IMPIMP

Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या अटकेचा मला अभिमान आहे – सुप्रिया सुळे

by nagesh
MP Supriya Sule | supriya sule criticized shinde fadnavis government after sanjay shirsat statement on sushma andhare

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev)
चित्रपटाचा प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी आणि प्रेक्षकांना मारहाण केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. त्यावर सुप्रिया सुळे (Supriya
Sule) यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यात इंग्रजांचे राज्य सुरु आहे. तो चूक करतो त्यांना माफी आणि जो आंदोलन करतो त्यांना शिक्षा, असा प्रकार सध्या सुरु आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे लढवय्ये नेते आहेत. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी नेले आहे. त्यावेळी आम्हाला कळाले की, पोलिसांवर वरुन दबाव आहे. यात पोलिसांची काही चूक नाही. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत, असे सुळे म्हणाल्या.

तसेच शिवाजी महाराज आम्हाला देवाच्या समान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी काही चुकीचे दाखवत असेल, आणि त्यांच्या विरोधात जर कोणी आवाज उठवत असेल, त्यासाठी त्याला अटक होत असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.
आम्हा सर्वांना या कामासाठी तुरुंगात जावे लागले तरी चालेल. आम्ही ‘जेल भरो’ आंदोलन करायला तयार आहोत.
तसेच या सरकारने ते कोणाच्या बाजुने आहेत, हे देखील स्पष्ट केले पाहिजे. ज्या व्हिडिओच्या आधारावर जितेंद्र आव्हाड यांना अटक केली गेली आहे.
त्यात कुठेही आव्हाड कोणाला मारताना दिसत नाहीत. मी तो व्हिडिओ पाहिला आहे.
त्यामुळे हे सरकार हुकुमशाही करत आहे. ऐतिहासिक चित्रपट बनविताना काळजी घेतली पाहिजे.
शिवाजी महाराज किंवा कोणत्याही मोठ्या राजावर चित्रपट बनविताना काळजी घेतली पाहिजे.
महाराष्ट्राचे इतिहास अभ्यासक आणि चित्रपट निर्माण करणारे यांची एकदा चर्चा व्हायला हवी.
इतिहास हा खरा असला पाहिजे. आणि तो खरा दाखविला पाहिजे.
त्यामुळे चित्रपट निर्माते आणि इतिहास लेखक यांची चर्चा सत्रे झाली पाहिजेत, असे देखील यावेळी सुळे (Supriya Sule) यावेळी म्हणाल्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Supriya Sule | har har mahadev row jitendra awhad arrested by vartaknagar police reaction on awhads arrest

हे देखील वाचा :

Rohit Pawar | “गोळीबार करणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि…”; रोहित पवारांकडून आव्हाडांची पाठराखण

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे?, जयंत पाटलांचा सवाल

Kailash Gorantyal | अब्दुल सत्तार मतिमंद आहेत, त्याला मतिमंदांच्या शाळेत पाठवा – कैलास गोरंट्याल

Related Posts