IMPIMP

Supriya Sule | ‘पत्रकार मुली साड्या का नाही नेसत?’ विधानावर सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

by nagesh
MP Supriya Sule | supriya sule criticized shinde fadnavis government after sanjay shirsat statement on sushma andhare

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – पिंपरी चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाषण केले होते. यावेळी त्यांनी पत्रकार महिला आणि मुली साडी का नाही नेसत, असा प्रश्न विचारला होता. त्यावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

माझ्या भाषणापूर्वी तिथे एक व्यापक चर्चा सुरू होती. त्या चर्चेला उद्देशून मी अनेक मुद्दे मांडले. मी माझ्या भाषणात कोणावरही टीका केली नाही. मी फक्त माझे मत मांडले आहे. कोणी काय घालावे, हा ज्याचा त्याचा वयक्तीक प्रश्न आहे, हे सुद्धा मी म्हंटले होते. त्यामुळे ते भाषण सर्वांनी पूर्ण ऐकावे. माझे 35 मिनिटांचे भाषण जर 17 सेकंदमध्ये दाखवण्यात येत असेल, तर त्यावर काय बोलणार. टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी जरुर टीका करावी. पण, माझे भाषण पूर्ण ऐकावे, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळी सुळे म्हणाल्या, पत्रकारीता क्षेत्रातील मुली साड्या का नाही नेसत, त्या जिन्स आणि टि-शर्ट वापरतात.
त्यांनी साड्या नेसल्या पाहिजे. आपण महाराष्ट्रात मराठी संस्कृती जपली पाहिजे.
आपण प्रत्येक गोष्टीचे पाश्चिमात्यीकरण करत आहोत. ते आपण केले नाही पाहिजे.
त्यामुळे मराठमोळा पोशाख करा. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती.
चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देताना मनोहर भिडे यांच्या टिकली प्रकरणाची तुलना त्यांच्यासोबत केली होती.
टिकली का नाही लावली, म्हणून एका पत्रकार मुलीला भिंडेंनी प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली होती. आता सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणार का, असे चित्रा वाघ यांनी विचारले होते. त्यावर सुळेंनी आपली बाजू मांडली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Supriya Sule | NCP MP supriya sule clarification on girl sari wearing statement in pune

हे देखील वाचा :

Pune – Navale Bridge Accident | नवले पुलावरील अपघात थांबेनात; पुन्हा 2 अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Pune – Navale Bridge Accident | नवले पूलावरील भीषण अपघात : टँकरचे ब्रेक फेल झाले नव्हते, RTO कडून मोठा खुलासा, पोलिस म्हणाले….

Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2 | ‘दृश्यम 2’मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य; पोस्ट व्हायरल

Related Posts