IMPIMP

Supriya Sule | ‘हे अजिबात चालणार नाही’ ! संसदेत सुप्रिया सुळे आक्रमक

by nagesh
Supriya Sule | ncp supriya sule in loksabha winter session slams bjp on border issue

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेत हिवाळी अधिवेशनाला आजपासून (बुधवार, दि. 07) सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. त्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे खासदार या मुद्यावरून सरकारला घेरत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या भाषणात भाजपला खडे बोल सुनावले आहेत. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी भूमिका मांडण्याची मागणी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्रासमोर गेले दहा दिवस एक नवीन प्रश्न उभा ठाकला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वाटेल ते बोलत आहेत. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राचे लोक जाणार होते. पण, त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र रचण्यात येत आहे. मराठी भाषिकांवर अन्याय, अत्याचार सुरू आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तरीदेखील कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विरोधात बोलत आहेत. महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली, हे चालणार नाही. हा देश एक आहे. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. मी अमित शहा यांना विनंती करते की, त्यांनी यावर काहीतरी बोलावे आणि या प्रश्नात लक्ष घालावे, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केल्यानंतर त्यावर महाराष्ट्रातील इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनीहीदेखील त्यांची री ओढली.
कर्नाटकच्या या भूमिकेचा आणि वर्तनाचा आम्ही धिक्कार करतो, असे म्हणत महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत घोषणाबाजी केली.
आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वांना शांत केले.
एकीकडे सुप्रिया सुळे आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक होत असताना,
दुसरीकडे कर्नाटकमधील भाजपा खासदार शिवकुमार उदासी यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते नेहमीच अशा प्रकारचे वर्तन करतात. त्यांना ‘लिंगो कल्चरल सिंड्रोम’ झाला आहे.
जेव्हा ते सत्तेतून पायउतार होतात, तेव्हा हे अशा प्रकारचे वर्तन करतात, असे शिवकुमार उदासी म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Supriya Sule | ncp supriya sule in loksabha winter session slams bjp on border issue

हे देखील वाचा :

Maharashtra Karnataka Border Issue | पुण्यात कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी अनोखी पद्धत; इडली, सांबार आणि मसाला डोश्यावर…

ICC Player of the Month | आयसीसीकडून नोव्हेंबरचे मानांकन जाहीर; ‘या’ 3 खेळाडूंत भारतीयाचा नाही समावेश

Kirit Somaiya | ‘साई रिसॉर्टची चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा’ – किरीट सोमय्या

Related Posts