IMPIMP

Supriya Sule On PM Modi | सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाल्या – ’56 इंच छाती फक्त भाषणापुरतं मर्यादित, पण वास्तवापासून दूर’

by nagesh
Supriya Sule | pm modi directs govt depts ministries to recruit 10 lakh people in one and half years supriya sule reacts

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन Supriya Sule On PM Modi | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह देशात देखील राजकीय वातावरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) युरोप (Europe) दौऱ्यावर आहेत. त्याचबरोबर चीन सीमेचा (China Border) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावरुन सत्ताधारी भाजप आणि विरोधकात राजकीय शीतयुद्ध रंगलं आहे. चीनच्या मुद्द्यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या (NCP Leader) आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”56 इंच की छाती वगैरे फक्त भाषणापुरते मर्यादित असते. पण वास्तवापासून दूर असते,” असं खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत. ”चीनचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तो गांभीर्याने घेतला पाहिजे. गेले काही दिवस लोकसभेत युद्धावर बोलत होते. युद्ध हा तोडगा नाही असे आम्ही जे संसदेत विचार मांडले होते, तेच पंतप्रधानांनी मांडले आहेत. युद्धात कोणी जिकंत नाही फक्त महिला विधवा होतात. 56 इंच की छाती वगैरे फक्त भाषणापुरतं मर्यादित असते. पण वास्तवापासून दूर असते,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule On PM Modi)

दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) वारंवार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधत असून, जातीयवादाचे राजकारण केल्याचा आरोप करत आहेत.
राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उत्तरे दिली जात असताना खा. सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली.
”दगड आंब्याच्या झाडावर मारले जातात. बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारते का ? त्यामुळे लोकं उठसुट शरद पवारांवर जातीचे आरोप करतात,” असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Web Title :- Supriya Sule On PM Modi | ncp supriya sule replied mns raj thackeray over sharad pawar criticism and modi govt on india china border issue

हे देखील वाचा :

Rajmudra On MNS Flag | ‘मनसे’च्या झेंड्यावरील राजमुद्रा बेकायदेशीर नाही; पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध वकिलाने दिला दाखला

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला काही तास शिल्लक, मुंबई पोलिसांकडून कारवाईला सुरुवात; 15000 हजार MNS कार्यकर्त्यांना नोटीस देऊन मुंबई सोडण्याचे दिले आदेश

Dilip Walse Patil | … तर कठोर पावले उचला; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे पोलिसांना आदेश

Related Posts