IMPIMP

Supriya Sule | PM मोदींच्या ‘त्या’ निर्णयावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

by nagesh
Supriya Sule | pm modi directs govt depts ministries to recruit 10 lakh people in one and half years supriya sule reacts

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यसभा निवडणुकीदरम्यान (Rajya Sabha Election) शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी काही अपक्ष आमदारांची (Independent MLA) नावे घेऊन दगाफटका केल्याचा आरोप केला. यावर राष्ट्रवादीचे (NCP) नेते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु या चर्चेत काहीच तथ्य नाही. संजय राऊत आणि अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांची नुकतीच भेट झाली. राऊत यांच्याबाबत आमची कुठलीही नाराजी नाही, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारी नोकऱ्या देण्यासंदर्भात केलेल्या घोषणचं स्वागत देखील सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अमरावती येथील अंबादेवी मंदिरात (Ambadevi Temple Amravati) दर्शन घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, मी मंदिरात काहीच मागायला येत नाही. केवळ आभार मानायला येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी (Presidential Election) घेतले जात आहे. याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. मी एका संघटनेत काम करते, खासदार असल्याने वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो. जर काँग्रेसने (Congress) शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला असेल, तर मी काँग्रेसचे आभार मानते.

पंतप्रधानांच्या घोषणेचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दीड वर्षात दहा लाख शासकीय नोकऱ्या (Government Jobs) देण्याची घोषणा आज केली आहे.
देशातील नव्या पिढीला नोकऱ्या मिळणार असतील तर या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करते, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

आघाडी सरकार मजबूत
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर (Vidhan Parishad Election) राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळेल, असा दावा भाजपने (BJP) केला आहे.
यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या अडीच वर्षापासून भाजपचे नेते तारखांवर तारखा देत आहेत.
पण महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे दडपशाहीचे सरकार
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीने (ED) नोटीस बजावले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, हे दडपशाहीचे सरकार आहे, विरोधात बोलणाऱ्या लोकांवर अशा पद्धतीने कारवाई करण्याचे काम भाजप सरकारच्या काळात गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे.

Web Title :- Supriya Sule | pm modi directs govt depts ministries to recruit 10 lakh people in one and half years supriya sule reacts

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘… पण उमेदवार कर्तुत्ववान आणि न्याय देणारा असावा’ ! राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीच्या चर्चेवरुन चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला

Heart Attack | खुलासा ! ‘हार्ट अटॅक’च्या वेळी हृदयात वेदनांसह आणखी खुप काही होते, जाणून घ्याल तर वाटेल आश्चर्य!

Former MLA Mohan Joshi | भाजपच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही – माजी आमदार मोहन जोशी

Related Posts