IMPIMP

Sushma Andhare | शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा जळगावमध्ये मोठा दावा

by nagesh
Sushma Andhare | sushama andhare eknath shinde group leader anil khochare criticize sushama andhare

जळगाव :  सरकारसत्ता ऑनलाईन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप प्रत्यारोपाचे राजकारण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मोठा दावा केला आहे. आम्ही बंडखोरांच्या परतीचे दोर कापले नसून शिंदे गटातील काही आमदार (Shinde Group MLA) नाराज आहेत. ते आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) या ‘महाप्रबोधन यात्रे’ निमित्त जळगावमध्ये आल्या आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी म्हटले की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले. बंडखोरांना माघारी परता येईल असे संकेत देताना त्यांचे परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नसल्याचे म्हटले. आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ असून त्यांना पश्चाताप होत आहे. ते आमच्या संपर्कात असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

भाजपवर (BJP) टीका करताना अंधारे म्हणाल्या, ईडी (ED), सीबीआयचा (CBI) भाजपकडून दुरुपयोग केला जात आहे. भाजपमध्ये असलेल्या कोणत्याही भ्रष्टाचारी नेत्याविरोधात कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात जिल्ह्यात झालेल्या अपहाराबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही.
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची ईडीसोबत जवळीक आहे.
त्यांनी पाचोरा येथील जमीन आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.

बच्चू कडू लढाऊ आणि स्वाभिमानी नेते
बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana)
यांच्यातील वादावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, बच्चू कडू हे लढाऊ आणि स्वाभिमानी आहेत.
त्यांच्यावर आरोप होणे हे चुकीचे आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे दु:ख होणे हे अपेक्षित आहे.
मात्र, रवी राणा हे उथळ व्यक्तीमत्त्वाचे असून चर्चेत राहण्यासाठी ते सतत काहीतरी बोलत असतात अशी टीका अंधारे यांनी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sushma Andhare |maharashtra politics shinde group mla can return in shivsena mla sanjay shirsath in contact says shivsena leader sushma andhare

हे देखील वाचा :

Police Suspended | पुण्यात महिलेला पोलिसाकडून मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा अन् निलंबनाची कारवाई

Maharashtra Additional Collector Transfer | राज्यातील 6 अपर जिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या ! नांदेड, पालघर, भंडारा आणि मुंबई येथील अधिकार्‍यांचा समावेश, सातार्‍याच्या अपर जिल्हाधिकारीपदी गलांडे

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या वडिलांनी शेअर केले तिचे बेडरुम सिक्रेट, म्हणाले – ‘मी तिच्या खोलीत जातो तेव्हा…’

Related Posts