IMPIMP

Sushma Andhare | ‘लढाई दोन वाघांची आहे ना; मग कुत्रे का फायदा घेत आहेत?’ – सुषमा अंधारे

by nagesh
Sushma Andhare | shiv sena sushma andhare criticizes mns raj thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेच्या ठाकरे गटाची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या यात्रेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. गुरुवारी मुलुंड येथे महाप्रबोधन यात्रेची सभा झाली, यावेळी सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरेंना टोला लावला आहे. लढाई दोन वाघांमध्ये आहे; पण कुत्रे त्याचा फायदा घेत आहेत, असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रसंगी सुषमा अंधारे यांनी दोन वाघांची गोष्ट सांगितली. अंधारे म्हणाल्या, एका जंगलात दोन वाघ होते ते शहाणे होते. या दोघांची प्रचंड मैत्री होती. लहानपणापासून ते एकत्र वाढले, खेळले, बसले होते. सर्व गोष्टीत त्यांनी एकमेकाला साथ दिली. कालांतराने दोघांमध्ये वितुष्ट आले. भांडण झाले. अ वाघ आणि ब वाघ समजून घ्या. एके दिवशी भांडण झाल्यावर ब वाघाने त्याच्या मुलाला सांगितले. अ वाघ वाईट आहे. तो असे करतो, तसे करतो. एकदा ब वाघ मुलाला शिकार शिकवायला गेला. तेव्हा ब वाघाला आणि त्याच्या मुलाला अ वाघ रस्त्यात बसलेला दिसला. ब खूश झाला. अ वाघ आजारी झाला होता. त्यावेळी कुत्र्यांचा घोळका तिथे येत होता. तेव्हा ब वाघाने कशाचाही विचार न करता कुत्र्यांवर झेप घेतली.

मग ब वाघाचा मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही अ चा एवढा राग करता, आज चांगली संधी चालून आली होती. त्यामुळे त्यांनी त्याला मारले असते. तुम्ही का मध्ये पडलात? ब शहाणा वाघ होता. तो नकलाकार नव्हता.
ब म्हणाला काहीही झाले तरी लढाई दोन वाघांमध्ये आहे, त्यात कुत्र्यांचा फायदा व्हायला नको.
पण, हे कळायला शहाणपण लागते, असे सुषमा अंधारे यांनी सभेत सांगितले.
त्यानंतर एकच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या गोष्टीत अप्रत्यक्ष राज ठाकरेंना टोला लावला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे असा संघर्ष राज्यात सुरू झाला आहे.
यामुळे शिवसेनेला पुन्हा नव्याने पक्षबांधणी करावी लागत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sushma Andhare | shiv sena sushma andhare criticizes mns raj thackeray

हे देखील वाचा :

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत

Pune Crime | पुण्याच्या विश्रांतवाडीतील सराईत गुन्हेगार राज भवार व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 111 वी कारवाई

Related Posts