IMPIMP

Sushma Andhare | सुषमा अंधारेंना वाटते देवेंद्र फडणवीसांची काळजी; “म्हणाल्या त्यांनी थोडा ताण….”

by nagesh
Sushma Andhare | thackeray group sushma andhare slams devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   माध्यमांशी बोलताना ठाकरे गटातील (Uddhav Thackarey Group) उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare), मला फडणवीसांची (Devendra Fadanvis) काळजी वाटत असल्याचा खोचक टोला लगावला. “सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद, गृहमंत्रीपद, एवढी सगळी खाती, उपमुख्यमंत्रीपद… माणसानं किती बिचाऱ्यानं काम करायचं. त्यांनी थोडा ताण कमी केला पाहिजे. गृहमंत्रीपद त्यांना झेपत नाहीये हे लक्षात येतंय. त्यांनी ते दुसऱ्या कुणाकडेतरी सोपवलं पाहिजे.” असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या.

त्यापुढे म्हणाल्या, “सगळ्याच बाबींवर मी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतेय की गृहमंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? त्यांची अडचण अशी होतेय की त्यांच्यावर कामाचा ताण फार आहे. मला देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटतेय. शेवटी मी त्यांची बहीण आहे.” महाराष्ट्रात नक्की गृहमंत्री आहे ना? असा सवाल ही त्यांनी केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री अब्दूल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळेंबाबत (Supriya Sule) चुकीचे विधान केले होते.
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी देखील सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) आक्षेपाहार्य वक्तव्य केले होते.
त्यासंबंधी बोलताना त्यांनी फडणवीसांवर सुद्धा हा नेम साधला. पुढे त्यांनी संभाजी भिडेंनी (Sambhaji Bhide)
एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना केलेल्या गैरवर्तना बद्दल ही देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले.

Web Title :- Sushma Andhare | thackeray group sushma andhare slams devendra fadnavis

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | “भावनिक ब्लॅकमेल करण्याची गरज नाही…”; मनसेचा आव्हाडांना सल्ला

NCP Mahesh Tapase | “बावनकुळे यांनी आपल्या मेंदूची आधी तपासणी करुन घ्यावी…”; राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांचा टोला

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरे पूर्णपणे काँग्रेसमय झाले आहेत, त्यांनी आता फक्त काँग्रेसचे संविधान स्वीकारायचे बाकी ठेवले आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Sudhir Mungantiwar | काँग्रेसची भूमिका नेहमीच शिवाजी आणि हिंदू देवतांच्या विरोधात राहिली आहे – सुधीर मुनगंटीवार

Related Posts