IMPIMP

Swatantryaveer Savarkar | सावरकरांच्या जन्मगावी राहुल गांधींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; संपूर्ण गावाने पाळला कडकडीत बंद

by nagesh
Swatantryaveer Savarkar | rahul gandhi controversial statement on savarkar bhagur bandh

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – काँग्रेस खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांची भारत जोडो पदयात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. यावेळी एकेठिकाणी भाषणात राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याविषयी भाष्य केले. त्यामुळे राज्यात भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (INC) आणि महाविकास आघाडी (MVA) वाद सुरु आहेत. दरम्यान त्यांच्या वक्तव्याचे पडसाद स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantryaveer Savarkar) जन्मगावी सुद्धा उमटत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आज भगूर (Bhagur) गावात बंद पाळण्यात आला. संपूर्ण भगूर बंद ठेवून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. भगूरमधील बाजारपेठा, इतर सर्व दुकाने आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले. तरी, बंदादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भगूरमधील नागरिकांनी बंदला प्रचंड पाठिंबा दिला आहे.

बंद घोषित होण्याआधी भगूर गावात मोठ्याप्रमाणात आंदोलन करण्यात आले.
एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने (Eknath Shinde Group), भाजपने आणि मनसेने (MNS)
ही आंदोलने केली. त्यात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनात राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
त्यांच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन केले गेले.
आंदोलनानंतर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या पुतळ्यावर दुधाने अभिषेक केला आणि थेट भगूर बंद करण्यात आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Swatantryaveer Savarkar | rahul gandhi controversial statement on savarkar bhagur bandh

हे देखील वाचा :

Modi Government | ‘या’ कायद्यामुळे नाही चोरता येणार चीनला तुमचा डेटा; मोदी सरकार लवकरच मांडणार नवीन विधेयक

Kirit Somaiya | ‘उद्या हे लोक सोनिया गांधींचे चरणस्पर्श देखील करतील’ – किरीट सोमय्या

Maharashtra Politics | महाविकास आघाडीच्या फुटीच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या जयराम रमेशांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, पण…”

Related Posts