IMPIMP

Syed Mushtaq Ali Trophy | राहुल द्रविडच्या ‘या’ शिष्याचे धमाक्यात कमबॅक !

by nagesh
Syed Mushtaq Ali Trophy | syed mushtaq ali trophy sanju samson remain unbeaten in 4 out of 6 matches

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Syed Mushtaq Ali Trophy | मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर केरळने हिमाचल प्रदेशवर ( Himachal Pradesh) मात करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) क्वार्टर फायनलमध्ये धमाक्यात प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेशने दिलेल्या 146 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केरळच्या अझरुद्दीनने 60 रन आणि कर्णधार संजू सॅमसनने नाबाद 52 रनची खेळी केली. त्यांच्या या धमाकेदार खेळीने केरळने हे आव्हान तीन बॉल शिल्लक असताना पार केलं. आयपीएलमध्ये (IPL ) संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) कॅप्टन्सी सोडल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकल्या होत्या. तसंच त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठीही टीम इंडियात निवड झाली नव्हती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

यानंतर संजू सॅमसनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत 6 इनिंगमध्ये त्याने 114 च्या सरासरीने 227 रन केले. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 144 चा आहे. तसेच स्पर्धेच्या 4 इनिंगमध्ये तो नाबाद राहिला, त्यामुळे त्याने टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी दंड थोपटले आहेत. हिमाचलचा ओपनर राघव धवनने ( Raghav Dhawan) 52 बॉलमध्ये 65 रन केले, तरीही त्यांना 6 विकेट गमावून 145 रनपर्यंतच मजल मारता आली. धवनशिवाय प्रशांत चोप्राने ( Prashant Chopra) 36 रन केले.

 क्वार्टर फायनलमध्ये आता केरळचा सामना 18 नोव्हेंबरला तामिळनाडूशी होणार आहे.

अंतिम-8 मुकाबल्यांमध्ये बंगाल विरुद्ध कर्नाटक, राजस्थान विरुद्ध विदर्भ, गुजरात विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामने रंगणार आहेत.
या स्पर्धेची सेमी फायनल 20 नोव्हेंबरला आणि फायनल 22 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तन्मय अग्रवालच्या ( Tanmay Agarwal) नावावर सर्वाधिक रन आहेत.
त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 302 रन केले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Syed Mushtaq Ali Trophy | syed mushtaq ali trophy sanju samson remain unbeaten in 4 out of 6 matches

हे देखील वाचा :

PM Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळतील 3 आणखी फायदे, जाणून घ्या कसे

Satara Police | दुर्देवी ! दीडच वर्षापुर्वी विवाह झालेल्या 29 वर्षीय पोलिसाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Sourav Ganguly | सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळणार मोठी जबाबदारी ! जाणून घ्या दादाच्या नव्या ‘इनिंग’बाबत

Related Posts