IMPIMP

Tax Exemption In Budget | नोकरी करणार्‍यांसाठी खुशखबर ! मिळू शकतात ‘या’ 3 भेट

by nagesh
Budget 2022 | budget 2022 good news before budget what you can get in fm nirmalas budget

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाTax Exemption In Budget | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 (Union Budget 2022) सादर करणार आहेत. यावेळी त्या चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प येण्यापूर्वी विविध क्षेत्रांनी त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या आहेत. कृषी क्षेत्र असो वा रिअल इस्टेट क्षेत्र, आरोग्य क्षेत्र असो की नोकरदार, प्रत्येकाच्या या वेळच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. (Tax Exemption In Budget)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

टॅक्स सवलतीत अनेक वर्षांपासून नाही वाढ
नोकरदार लोकांना मोदी सरकारने कर सवलत मर्यादा (Tax Exemption limit) वाढवणे अपेक्षित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर सवलतीच्या मर्यादेत कोणतीही वाढ झालेली नाही. सरकार निवडणुकीपूर्वी करमाफीची घोषणा करून नोकरदारांना भुरळ घालू शकते, असे मानले जात आहे. या बजेटमध्ये पगारदार व्यक्तीला आणखी काय काय मिळू शकते ते जाणून घेऊया.

कर सवलत मर्यादा वाढू शकते
सध्या करमुक्तीची मर्यादा 2.5 लाख रुपये आहे. गेल्या 8 वर्षांपासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी करमाफीची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आली होती.

ही सूट अडीच लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी करदात्यांकडून होत आहे. मात्र सरकार ती तीन लाखांपर्यंत वाढवू शकते, अशी अपेक्षा आहे. यावेळी यूपीसारख्या मोठ्या राज्यात निवडणुक होत आहे, तेव्हा सरकार नोकरदारांना खुश करू शकते. (Tax Exemption In Budget)

80 सी मध्ये वाढू शकते सवलतीची कक्षा
सध्या प्राप्तीकर कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट देण्याची तरतूद आहे.
2014 मध्ये त्यात एक ते दीड लाखांपर्यंत वाढ करण्यात आली.
पगारदार व्यक्तीचा कर वाचवण्यासाठी हा विभाग सर्वात महत्त्वाचा आहे.
या अर्थसंकल्पात ही मर्यादा दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत वाढवणे अपेक्षित आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

करमुक्त होऊ शकते 3 वर्षांची एफडी
इंडियन बँक असोसिएशन (IBA) ने मागणी केली आहे की करमुक्त एफडीचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांवरून तीन वर्षांपर्यंत कमी करावा. बँकांनीही व्याजदर कमी केले आहेत.

एफडीच्या तुलनेत पीपीएफवरील व्याजदर चांगला आहे.
अशा परिस्थितीत लोक एफडीमध्ये कमी गुंतवणूक करत आहेत.
गुंतवणूकदारही म्युच्युअल फंड आणि शेअर्सकडे वळत आहेत.
या बाबतीत, तीन वर्षांची एफडी टॅक्स सेव्हर एफडीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकते.

Web Title :-  Tax Exemption In Budget | tax exemption in budget salaried class may get these income tax benefits in budget 2022

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 6441 रुग्णांचे निदान, मृतांची संख्या वाढली; जाणून घ्या इतर आकडेवारी

Latur Crime | धक्कादायक ! भावजयीशी फोनवर बोलतो म्हणून तरुणाला जिवंत जाळलं; महिन्यानंतर उकललं गूढ

Tere Naam | जलपरी बनली ‘तेरे नाम’ची भोळी अभिनेत्री, व्हिडीओमध्ये बिकिनी घालून दिसली पूलमध्ये

Related Posts