IMPIMP

Tax Saving Tips | इन्कम टॅक्स Rebate मिळवण्यासाठी 80C ची मर्यादा संपल्यानंतर सुद्धा घेऊ शकता 1 लाखापर्यंत सवलतीचा लाभ, ‘ही’ आहे प्रक्रिया

by nagesh
New TDS Rules | new tds rules now influencers will also have to pay tds new rules come into effect from today

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाTax Saving Tips | आर्थिक वर्ष 2021-2022 (Financial Year 2021-2022) संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत 31 मार्चपर्यंत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे प्लॅनिंग (Investment Planning) करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला कर सवलतीचा (Tax Relief) लाभ मिळू शकेल. प्राप्तीकर कलम 80 सी अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत (Tax Rebate) देण्याची तरतूद आहे. (Tax Saving Tips)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या कलमांतर्गत, कर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी (Tax Rebate Benefits) तुम्ही अनेक प्रकारची गुंतवणूक करू शकता. परंतु जर तुम्ही प्राप्तीकराच्या कलम 80 सी (Income Tax Rebate Section 80C) अंतर्गत सर्व पर्यायांचा वापर केला असेल, तर तुमच्याकडे कर टाळण्याचा आणखी एक पर्याय आहे.

तुमच्या प्राप्तीकराच्या कलम 80 डी (Income Tax Rebate Section 80D) अंतर्गत तुम्हाला काही कर सवलत मिळू शकते. यामध्ये तुम्हाला आरोग्य विमा घेतल्यावर 1 लाखाची वेगळी कर सूटही मिळते. या कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कुटुंब आणि पालकांच्या आरोग्य विम्या (Health Insurance) ची मदत घेऊ शकता. (Tax Saving Tips)

आई-वडिलांच्या आरोग्य विम्यावर मिळतो जास्त लाभ (Parental Health Insurance Benefits)

प्राप्तीकर नियमांनुसार, तुम्हाला 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीच्या आरोग्य विम्यावर 25 हजारांपर्यंत सूट मिळते. दुसरीकडे, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला सूट दिल्यास, तुम्हाला 50 हजारांपेक्षा जास्त कर सवलतीचा लाभ मिळतो. तुम्ही आई – वडील दोघांसाठी आरोग्य विमा योजना (Health Insurance Plan) खरेदी केल्यास तुम्हाला 75 हजार रुपयांची सूट मिळेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दुसरीकडे, जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही स्वत:साठी आणि तुमच्या आई – वडिलांसाठी आरोग्य विमा खरेदी केला असेल, तर तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळू शकतो. याच्या मदतीने तुम्हाला आरोग्य पॉलिसीचा लाभ मिळेल तसेच टॅक्स बेनिफिटचाही (Tax Benefit) फायदा मिळेल.

आरोग्य विमा खरेदी करण्याचा दुहेरी लाभ (Double Benefit of Buying Health Insurance)

आरोग्य विमा खरेदी करून तुम्हाला दोन प्रकारचे फायदे मिळतात. प्रथम म्हणजे तुम्हाला प्राप्तीकरात सूट (Income Tax Deduction) मिळते.
दुसरीकडे, तुम्हाला कोणत्याही आजाराच्या बाबतीत कव्हरचा लाभ मिळतो.
आरोग्य विम्याकडे केवळ कर वाचवण्याचे साधन म्हणून पाहिले जाऊ नये, असे विमा तज्ज्ञांचे मत आहे.
भविष्यात आरोग्याशी संबंधित खर्चाच्या समस्येवर मात करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

Web Title :- Tax Saving Tips | tax saving tips tax rebate other than section 80c health insurance benefits

हे देखील वाचा :

Dombivli Crime | सोफा सेटमधील ‘त्या’ मृतदेहाचं गूढ उकललं, चौकशीत धक्कादायक कारण आलं समोर

Pune Crime | सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेकडून अटक, दोन दुचाकी जप्त

Pune Crime | दुचाकी आणि अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांकडून अटक; 2 लाखाचा मुद्दमाल जप्त

Related Posts