IMPIMP

Thane Crime | वेळेवर नाष्टा न दिल्याने रागाच्या भरात बांधकाम व्यावसायिकाकडून सुनेची गोळी घालून हत्या

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइनThane crime | सकाळी नाश्ता दिला नाही या रागातून सासऱ्याने सुनेवर गोळी झाडल्याची घटना ठाण्याच्या (Thane crime) राबोडी मध्ये समोर आली आहे. या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या सीमा पाटील Seema Patil (वय – 42) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मारेकरी सासरा काशिनाथ पाटील Kashinath Patil (वय – 74) हे घटनेनंतर पळून गेले आहेत. ज्या बंदुकीतून (Gun) गोळीबार (Firing) केला, ती परवानाधारक (Licensee) बंदूक आहे. तसेच फरार सासऱ्याच्या मागावर पोलीस पथक असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी (Rabodi Police) दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बांधकाम व्यावसायिक (Builders) असलेले मारेकरी काशिनाथ पाटील यांना दोन मुले आहेत.
हे कुटुंब एकत्र राहत असून काशिनाथ यांचे त्यांच्या पत्नीसह दोन्ही सुनांबरोबर वारंवार खटके उडत होते.
त्यातच ते नातेवाईकांकडे सुनांची बदनामी (Defamation) करत होते. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काशिनाथ पाटील यांना नाश्ता मिळाला नाही.

याच रागातून त्यांनी बंदूक काढून मोठा मुलगा राजेंद्र यांची पत्नी सीमा यांच्या पोटात गोळी झाडली.
हा प्रकार छोट्या सुनेसमोर घडला. जखमी झालेल्या सीमा यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे शस्त्रक्रिया (Surgery) ही करण्यात आली. मात्र गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करून फरार झालेल्या काशिनाथ पाटील यांचा शोध घेत असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली. (Thane crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सासरे काशिनाथ यांनी ज्या बंदुकीतून गोळीबार झाला ती परवानाधारक आहे.
तसेच काशिनाथ हे फरार असून त्यांना सकाळी नाश्ता मिळाला नसल्याने त्यांनी गोळी झाडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
छोट्या सुने समोर हा प्रकार घडला असून त्यांच्या तक्रारीवरून राबोडी पोलीस ठाण्यात (Rabodi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी काशिनाथ पाटील याच्याविरुद्ध आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 506 (जीवे मारण्याची धमकी) 302 (खून) व्यतिरिक्त आर्म्स अ‍ॅक्टचा (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Thane Crime | Murder of daughter in law by a builder out of anger for not giving breakfast on time

हे देखील वाचा :

Maharashtra BJP | ‘नास्तिक शरद पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी, ही कोणत्या प्रकारची नास्तिकता ?’, भाजपचा शरद पवारांवर हल्लाबोल

Kirit Somaiya | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेहुण्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांचा आणखी एक गंभीर आरोप

Pune Wakad Crime | पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून नराधमाकडून 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या वाकड परिसरातील घटना

Related Posts