IMPIMP

Thane Police Website Hack | जगभरातील मुस्लिमांची माफी मागण्याचे आव्हान ! प्रेषित अवमान प्रकरणी ठाणे पोलीस दलाची वेबसाईट ‘हॅक’; देशातील सरकारी कार्यालयांच्या अनेक वेबसाईटवर हल्ला

by nagesh
Thane Police Website Hack | unknown hack of thane police website challenging muslims around the world to apologize

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनThane Police Website Hack | प्रेषित मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणात (Prophet Muhammad Insult
Case) अनेक मुस्लिम देशातून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर आता मलेशियातील (Malaysia) एका ग्रुपने ठाणे पोलीस दलाची वेबसाईट हॅक
केल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे पोलीस दलाची वेबसाईट हॅक करुन त्यावर धमकी देणारा संदेश (Threatening message) पोस्ट करण्यात
आला आहे. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

इंडोनेशियातील वन हेट सायबर टीम (One Hate Cyber Team Indonesia) असे नाव सांगणार्‍या ग्रुपने ही वेबसाईट हॅक केली आहे. भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा (BJP spokesperson Nupur Sharma) यांनी प्रेषितांबाबत अवमानकारक भाषा वापरली होती. त्याचा देशभरातून निषेध करुन आंदोलने केली जात आहे. अरब देशातूनही (Arab Countries) त्याविरोधात मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर आता जगभरातील मुस्लिमांची (Muslims) माफी मागितली जात नाही. तोपर्यंत भारतीय सरकारी संस्थांच्या वेबसाईट हॅक कराव्यात असे आवाहन जगभरातील मुस्लिम हॅकर्संना (Muslim Hackers) केले जात आहे. त्यामुळे भारतातील अनेक सरकारी संस्थांच्या वेबसाईटवर सायबर हल्ले (Cyber Attacks) सुरु झाले आहेत.

ठाणे पोलीस दलाची वेबसाईट हॅक (Thane Police Website Hack) करण्यात आली. त्यावर एक संदेश प्रसारित करण्यात आला आहे.
त्यात वन हेट सायबर टीम यांनी ही वेबसाईट हॅक केल्याचे म्हटले आहे.
इंडियन गव्हर्नमेंट (Indian Government) आणि सर्वांना त्यांनी त्यात आवाहन केले आहे. मुस्लिम धर्माबाबत वारंवार आक्षेपार्ह विधाने केली जातात. जोपर्यंत जगभरातील मुस्लिमांची माफी मागत नाही तोपर्यंत हे होत राहणार आहे. इंडोनेशियातून ही वेबसाईट हॅक केल्याचे त्यावरुन दिसून येत आहे.

Web Title :- Thane Police Website Hack | unknown hack of thane police website challenging muslims around the world to apologize

हे देखील वाचा :

Pune PMC Recruitment 2022 | पुणे महापालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! पुढील आठवड्यात अभियंता आणि लिपिकांच्या मेगा भरतीसाठी जाहिरात

Healthy Food | तोंडलीची भाजी खाल्ल्याने डायबिटीजमध्ये होतो लाभ आणि वजन सुद्धा होते कमी, जाणून घ्या Ivy Gourd चे 5 फायदे

Bombay High Court | हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले – ‘शरद पवारांचीच प्रतिष्ठा तुम्ही कमी करताय’

Related Posts